

Election Commission announces extension of the SIR interim period across six states to ensure streamlined electoral procedures.
esakal
Election Commission Extends SIR Deadline in Six States : देशभरात सध्या पश्चिम बंगालसह अनेक राज्यांमध्ये SIRच्या मुद्य्यावरून राजकीय वातावरण तापलेलं आहे. विरोधी पक्षांकडून या प्रकियेस कडाडून विरोध दर्शवला जात आहे. दरम्यान, आता निवडणूक आयोगाने आज एक मोठा निर्णय जाहीर केला आहे.
निवडणूक आयोगाने सहा राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदार याद्यांची विशेष सघन पुनरावृत्ती म्हणजेच SIR साठीची अंतिम मुदत वाढवली आहे. विशेष म्हणजे या राज्यांमध्ये पश्चिम बंगालचा समावेश नाही, जिथे विरोधक SIR बद्दल सर्वाधिक आक्रमक आहेत.
याशिवाय, सर्व १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेचा भाग म्हणून निवडणूक आयोगाने बुधवारी महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत. निवडणूक आयोगाने संबंधित राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना बूथ स्तरावर तयार केलेल्या अनुपस्थित, हस्तांतरित, मृत किंवा डुप्लिकेट मतदारांच्या याद्या राजकीय पक्षांच्या बूथ-स्तरीय एजंट्ससोबत शेअर करण्याचे निर्देश दिले आहेत.
तर निवडणूक आयोगानुसार, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये, SIR प्रक्रिया १८ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जाईल आणि मसुदा मतदार यादी २३ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. तामिळनाडू आणि गुजरातमध्ये, १४ डिसेंबरपर्यंत फॉर्म भरले जातील आणि मसुदा मतदार यादी १९ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल. उत्तर प्रदेशात, २६ डिसेंबरपर्यंत फॉर्म भरले जातील आणि मसुदा मतदार यादी ३१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.
याशिवाय, गोवा, गुजरात, लक्षद्वीप, राजस्थान आणि पश्चिम बंगालसाठी, फॉर्म भरण्याची अंतिम तारीख आज, ११ डिसेंबर २०२५ रोजी संपेल. मसुदा मतदार यादी १६ डिसेंबर २०२५ रोजी प्रकाशित केली जाईल. तर केरळमध्ये SIR वेळापत्रकात पूर्वी बदल करण्यात आला होता. एसआयआर प्रक्रिया १८ डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे आणि मसुदा मतदार यादी २३ डिसेंबर रोजी प्रकाशित केली जाईल.