Gyanesh Kumar
esakal
निवडणूक आयोगाने कामकाजाच्या पद्धतीत पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे बदल केले आहेत. नव्या निर्णयानंतर आता आयोगाच्या बैठकांचे अजेंडे आधीच जाहीर केले जाणार आहेत. तसेच बैठकीनंतर त्यातील चर्चेचे मिनिट्सही जारी केले जातील. याआधी अशा प्रकारची प्रक्रिया राबवली जात नव्हती. त्यामुळे आयोगाच्या बैठकांमध्ये कोणत्या विषयांवर चर्चा होणार आहे आणि त्यात कोणते निर्णय घेतले जात आहेत याची माहिती सहज मिळणार आहे.