

Election Commission of India Reshuffle
esakal
Gyanesh Kumar Resignation Demand : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून आंदोलन सुरू असतानाच भारतीय निवडणूक आयोगातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे चर्चेला उधाण आले आहे. राजस्थान संवर्गातील २०१० च्या तुकडीचे आयएएस अधिकारी प्रकाश राजपुरोहित यांची उपनिवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी या पदावर असलेल्या संजय कुमार यांना मुदतीपूर्वी मूळ संवर्गात परत पाठविण्यात आले होते. त्यामुळे आयोगातील या बदलांकडे लक्ष वेधले जात आहे.