Boney Kapoor यांची 66 किलोची चांदीची भांडी पकडली; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई

कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.
Boney Kapoor Election Commission
Boney Kapoor Election Commissionesakal
Summary

कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत असल्यामुळं इथं कडक तपासणी सुरू आहे. आयोगानं इथं जागोजागी तपासणी नाके उभारले असून यातल्याच एका नाक्यावर ही भांडी पकडण्यात आली आहेत.

Karnataka Assembly Election 2023 : कर्नाटकात 10 मे रोजी मतदान होणार असून 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे. याच पार्श्वभूमीवर, राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे, त्यामुळं ठिकठिकाणी चोख बंदोबदस्त तैनात करण्यात आला आहे.

याचदरम्यान निवडणूक आयोगानं एक मोठी कारवाई केली आहे. बॉलीवूड चित्रपट निर्माते, दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीचे पती आणि अभिनेत्री जान्हवी कपूरचे वडील बोनी कपूर (Boney Kapoor) यांच्या मालकीची 66 किलोची चांदीची भांडी निवडणूक आयोगानं (Election Commission) पकडली आहेत.

Boney Kapoor Election Commission
Karnataka Election : विधानसभा निवडणुकीत लिंगायत ठरणार 'किंगमेकर'; मुस्लिम, ख्रिश्चनांचं मतदान किती?

चेकपोस्टवर भांडी पकडली

शुक्रवारी पहाटे दावणगिरी परिसरातील हेब्बालू टोल नाक्याजवळच्या चेकपोस्टवर ही भांडी पकडली. ही भांडी वैध कागदपत्रांशिवाय एका बीएमडब्ल्यू गाडीतून चेन्नईहून मुंबईला आणण्यात येत होती. पाच खोक्यांमध्ये भरून ही भांडी नेण्यात येत होती.

Boney Kapoor Election Commission
Karnataka Election : कर्नाटक निवडणुकीत काँग्रेस जिंकणार की हरणार? शरद पवारांचं मोठं भाकीत

कडक तपासणी सुरू

कर्नाटकात विधानसभा निवडणुका होत असल्यामुळं इथं कडक तपासणी सुरू आहे. आयोगानं इथं जागोजागी तपासणी नाके उभारले असून यातल्याच एका नाक्यावर ही भांडी पकडण्यात आली आहेत. या भांड्यांमध्ये बाऊल, चमचे, पाणी पिण्याची भांडी यांचा समावेश आहे. या भांड्यांची किंमत 39 लाख रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे.

Boney Kapoor Election Commission
Rahul Gandhi यांना शिक्षा सुनावणाऱ्या न्यायाधीशांची जीभ कापून टाकू; काँग्रेस नेत्याची थेट धमकी

गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलिसांनी हरी सिंह आणि गाडीचा चालक सुलतान सिंह यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. चौकशीदरम्यान ही गाडी बे व्ह्यू प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावावर असल्याचं कळालं. ही कंपनी बोनी कपूर यांच्या मालकीची आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com