जम्मू काश्मीरमध्ये दोन ठिकाणी दहशतवादी हल्ला; एक दहशतवादी ठार

हल्लेखोरांच्या शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांने परिसरात नाकाबंदी केली आहे.
terrorist
terrorist sakal

काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये (Terrorist ) चकमक सुरू असून, या चकमकीदरम्यान सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याचा खात्मा केला आहे. ठार झालेल्या दहशतवाद्याची अद्याप ओळख पटलेली नाहीये. अवंतीपोरा पोलीस, आर्मी आणि सीआरपीएफचे संयुक्त पथक या कारवाईमध्ये सहभागी आहेत. (One terrorist neutralized in Awantipora J&K)

अवंतीपोरा पोलिसांना नंबाल परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाली होती. त्याआधारे परिसराची नाकाबंदी (cordoned off) करून शोधमोहीम सुरू करण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला. त्याला प्रत्युत्तरादाखल करण्यात आलेल्या गोळीबारात एका दहशतवादी ठार झाला.

गांदरबलमध्ये दहशतवाद्यांनी केला ग्रेनेड हल्ला

सोमवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना लक्ष्य करत गांदरबलमध्ये ग्रेनेड हल्ला () केला. मात्र निशाणा चुकल्याने याचा रस्त्यावरच स्फोट झाला. या हल्ल्यामध्ये कोणतीही हानी अथवा जीवितहानी झालेली नसून, हल्लेखोरांच्या शोध घेण्यासाठी सुरक्षा दलांनी परिसरात नाकाबंदी केली असून शोध मोहीम सुरू केली आहे. (Grenade Attack On security Bunker in Ganderbal district J&K)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com