

1xBet Case Celebrity Seized Asset
ESakal
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) बेकायदेशीर बेटिंग अॅप (१x बेट) प्रकरणात मोठी कारवाई केली आहे. या कारवाईचा एक भाग म्हणून अनेक चित्रपट तारे आणि माजी क्रिकेटपटूंच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. ज्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे त्यात अभिनेत्री उर्वशी रौतेला, अभिनेता सोनू सूद, मिमी चक्रवर्ती, माजी भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंग, रोहिण उथप्पा, अंकुश हजारा आणि नेहा शर्मा यांचा समावेश आहे.