esakal | Engineer's Day 2021 :विश्वेश्वरैय्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारं महाविद्यालय माहितीय का?
sakal

बोलून बातमी शोधा

mokshagundam vishveshwarya

भारतातील महान इंजिनिअर्समध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. या क्षेत्रात विश्वेश्वरैय्या यांनी मोठं काम केलं असून आपल्या कामातून गोरगरीबांना, देशातील जनतेचा त्रास, समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले.

Engineer's Day : विश्वेश्वरैय्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारं महाविद्यालय माहितीय का?

sakal_logo
By
सकाऴ वृत्तसेवा

Engineer's Day 2021 ; भारतात दरवर्षी 15 सप्टेंबर हा दिवस 'इंजिनिअर्स डे' म्हणून साजरा केला जातो. भारतरत्न एम विश्वेश्वरैय्या यांच्या जन्मदिनानिमित्त हा दिवस साजरा करण्यात येतो. भारतातील महान इंजिनिअर्समध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. या क्षेत्रात विश्वेश्वरैय्या यांनी मोठं काम केलं असून आपल्या कामातून गोरगरीबांना, देशातील जनतेचा त्रास, समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. भारतात शुद्ध पाण्याचा पुरवठा आणि वीज आणण्याचं काम त्यांनी केलं. पावसाळ्यात पुराच्या संकटावर त्यांनी उपाययोजना केल्या. फक्त आपल्या क्षेत्रात काम करून ते थांबले नाहीत तर त्यांनी १९१७ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय बेंगलोरमध्ये स्थापन केले. भारतातील पहिलं अभियांत्रिकी महाविद्यालय अशी ओळख त्याची आहे.

हेही वाचा: Engineers Day : अभियंत्यांच्या कल्पकतेमुळे सोलापुरात जलक्रांती!

देशातील अनेक नद्यांवर धरणांसाठी प्रस्ताव देण्यापासून ते धरण बांधणीमध्ये त्यांनी काम केलं आहे. कावेरी नदीवर उभारलेल्या कृष्णराजसागर धरणाच्या कामामुळे त्यांना म्हैसूर राज्याचे पिता म्हटले जाऊ लागले. भारत सरकारने १९६८ मध्ये डॉक्टर एम विश्वेश्वरैय्या यांचा जन्मदिन इंजिनिअर्स डे म्हणून साजरा करण्याची घोषणा केली होती. विश्वेश्वरैय्यांचा जन्म १८६० रोजी तत्कालीन म्हैसूर राज्यातील कोलार जिल्ह्यात झाला. विश्वेश्वरैय्या यांना १०१ वर्षांचे दीर्घायुष्य लाभले होते. १९५५ मध्ये त्यांना भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न देऊन गौरवण्यात आले होते.

हेही वाचा: Engineers Day : 15 सप्टेंबरला का साजरा होतो 'इंजिनियर्स डे', वाचा

मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या यांनी एक इंजिनिअर म्हणून देशात अनेक धरणांची निर्मिती केली. यामध्ये म्हैसूरमध्ये कृष्णराज, ग्वाल्हेरमध्ये तिगरा, पुण्यातील खडकवासला धरणाचा समावेश आहे. याशिवाय हैदराबाद शहर वसवण्याचंही श्रेय विश्वेश्वरैया यांना जाते. कोल्हापूरमधील राधानगरी धरणाच्या कामातही त्यांचे योगदान आहे. या धरणाचे सातही दरवाजे स्वयंचलित असे आहेत. धरण भरले की पाण्याचा दाब दरवाजांवर पडून ते उघडतात. गुरुत्वाकर्षण शक्तीच्या आधारावर दरवाजांची अशी रचना असलेलं राधानगरी धरण हे देशातील पहिलं आणि एकमेव धरण आहे. विशाखापट्टणम इथं बंदर हे समुद्राच्या पाण्यापासून गंजू नये यासाठीची प्रणाली तयार करण्यातही त्यांनी पुढाकार घेतला होता.

loading image
go to top