
Engineers Day 2025:
Sakal
ए. ललिता या भारतातील पहिल्या महिला इंजिनीअर होत्या.
त्यांनी चूल आणि मूल यामध्ये अडकलेल्या समाजात नवी वाट दाखवली.
त्यांच्या वडिलांच्या प्रोत्साहनाने त्यांनी मद्रास इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये प्रवेश घेतला आणि १९४३ मध्ये डिग्री मिळवली. त्यांनी अनेक ठिकाणी काम केले आणि भाखडा नांगल प्रोजेक्टमध्ये सहभाग घेतला.
Who was India's first female engineer A Lalitha: इंजिनीअर्सने देशासाठी दिलेल्या योगदानाच्या गौरवार्थ दर वर्षी देशात १५ सप्टेंबरला इंजीनिअर्स डे साजरा केला जातो. देशातील महान इंजिनीअर मोक्षगुंडम विश्वेश्वरैया यांचा जन्म दिवस म्हणून त्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. त्यांनी आधुनिक भारताचे निर्माण केले व देशाला नवे रूप दिले. अनेक नद्यांसाठी बांध आणि पूल बनवले. त्यामुळेच देशाला अनेक मोठे आणि कर्तबगार इंजिनीअर मिळाले. पण रस्ते, बांध किंवा आधुनिक भारताच्या निर्माण मध्ये केवळ पुरूषांचेच नाही तर महिलांचे योगदानही महत्वपूर्ण आहे.