esakal | तृतीयपंथीयांच्या समान संधीसाठी काम करायला उत्सुक - अदर पुनावाला
sakal

बोलून बातमी शोधा

तृतीयपंथीयांच्या समान संधीसाठी काम करायला उत्सुक - अदर पुनावाला

तृतीयपंथीयांच्या समान संधीसाठी काम करायला उत्सुक - अदर पुनावाला

sakal_logo
By
विनायक होगाडे

पुणे : जगभरात सध्या कोरोनाचं संकट घिरट्या घालत आहे. भारतात आलेली कोरोनाची दुसरी लाट सध्या ओसरत आहे. या संकटामध्ये मोठ्या प्रमाणावर जीवित तसेच वित्तहानी झालेली आहे. कोरोनाचं संकट हाताळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अनेकांचा रोजगार बुडाला आहे. काहींच्या नोकऱ्या कायमस्वरुपी गेल्या आहेत. त्यामुळे अतोनात आर्थिक नुकसान झालेलं पहायला मिळत आहे. मात्र, समाजात असे अनेक घटक आहेत, जे दुर्लक्षित आहेत. त्यांच्या सुख-दु:खांकडे समाजाचं लक्षच नसतं. असाच एक समुदाय म्हणजे तृतीयपंथी समाज होय.

हेही वाचा: 'कोरोना हे थोतांड आहे'; संभाजी भिडेंचं पुन्हा अजब विधान

हेही वाचा: कोरोनाच्या सावटाखाली जगन्नाथ रथयात्रा; PM मोदींच्या शुभेच्छा

या समाजाच्या आरोग्यविषयक समस्यांकडे फारसं लक्ष पुरवलं जात नाही. कोरोनाच्या या महसंकटात अर्थातच या समाजाचं अतोनात नुकसान झालेलं आहे. या समुदायातील लोकांना देखील प्राधान्याने लस मिळाली पाहिजे, असा सद्हेतू ठेवत सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी ट्विट केलंय.

मला नेहमीच असं वाटत आलंय की, आरोग्यसेवा आणि प्रतिष्ठा हे मूलभूत मानवी अधिकार आहेत. मी तृतीयपंथी समुदायाला समान संधी उपलब्ध करुन देण्यासाठी लक्ष्मी नारायण त्रिपाठी (तृतीयपंथी कार्यकर्त्या) यांच्याशी सहकार्य करण्यास उत्सुक आहे, असं ट्विट सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनी केलं आहे.

loading image