कोरोनाच्या सावटाखाली जगन्नाथ रथयात्रा; PM मोदींच्या शुभेच्छा

Jagannath Rath Yatra 2021
Jagannath Rath Yatra 2021
Summary

ओडिशाच्या पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रा (Jagannath Rath Yatra) सुरु झाली आहे. दर आषाढी महिन्यात शुक्ल पक्षच्या द्वितीया तिथीवर भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत शहर भ्रमणासाठी बाहेर पडतात.

नवी दिल्ली- ओडिशाच्या पुरी येथील भगवान जगन्नाथ रथयात्रा (Jagannath Rath Yatra) सुरु झाली आहे. दर आषाढी महिन्यात शुक्ल पक्षच्या द्वितीया तिथीवर भगवान जगन्नाथ आपले मोठे बंधू बलराम आणि बहीण सुभद्रा यांच्यासोबत शहर भ्रमणासाठी बाहेर पडतात. देवशयनी एकादशी (20 जुलै) पर्यंत चालणाऱ्या या यात्रेवर कोरोना महामारीचं संकट आहे. त्यामुळे भक्तांविना या यात्रेला परवानगी देण्यात आली आहे. सलग दुसऱ्या वर्षी भक्तांविना ही यात्रा निघत आहे. या यात्रेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी भक्तांना शुभेच्छा दिल्या. (Jagannath Rath Yatra 2021 pm narendra modi greets)

सर्वसाधारणपणे यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी देशभरातून लोक पुरी येथे येत असतात. या यात्रेमध्ये 3 हजार सेवादार आणि प्रशासनाचे लोक सहभागी होतील. जिल्हा प्रशासनाने रविवारी रात्री 8 पासून 2 दिवसांसाठी संपूर्ण शहरात कर्फ्यू लागू केला आहे. पवित्र रथ तीन किलोमीटर दूर गुण्डीचा मंदिर येथे जाईल. भगवान जगन्नाथ सात दिवसांसाठी याच ठिकाणी आराम करतील.

Jagannath Rath Yatra 2021
आठवण पानशेतच्या पुराची : तडाखा आणि उभारी

अमित शहा यांनी सकाळी पहाटे अहमदाबादमधील भगवान जगन्नाथाची मंगला आरती केली. त्यानंतर देव-प्रतिमांना यात्रेसाठी बाहेर काढण्यात आलं. शहा परिवारासह आरतीमध्ये सहभागी झाले होते. रथयात्रेच्या पूर्वी मंदिराची भव्य सजावट करण्यात आली होती. यासह मोठ्या प्रमाणात सुरक्षा जवानांना तैनात करण्यात आलं आहे. मंदिर परिसरात कसल्याही प्रकारच्या उपक्रमांना बंदी आहे. यात्रा व्यवस्थीतपणे पार पडावी यासाठी जवानांच्या 65 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. प्रत्येक तुकडीमध्ये 30 जवान आहेत.

Jagannath Rath Yatra 2021
शरद पवारांच्या 'ती लहान माणसं' वक्तव्यावर पटोलेंची प्रतिक्रिया

पुरीचे जिल्हाधिकारी समर्थ वर्मा यांनी लोकांना आवाहन केलंय की, कर्फ्यूच्या दरम्यान रविवारी 8 ते मंगळवारी 8 वाजेपर्यंत कोणीही घराच्या बाहेर निघू नये. तसेच मैदानात गर्दी करु नये. लोक आपल्या घरुन टीव्हीवर भगवान जगन्नाथाची यात्रा पाहू शकतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com