

नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिस वोटिंग मशीन अर्थात ईव्हीएम विरोधातील कायदेशीर लढाईत विरोधकांनी आता एक पाऊल पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शुक्रवारी ईव्हीएममधील घोटाळ्यांच्या पुराव्यांसह याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्यानं चार महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश असणार आहे. ज्येष्ठ विधीज्ञ अभिषेक मनु सिंघवी हे यासंदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करणार आहेत.