ज्येष्ठ शास्त्रज्ञ व इस्रोचे माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचे निधन

वृत्तसंस्था
सोमवार, 24 जुलै 2017

आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहा पुरस्कार आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

बंगळूर : आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अवकाश संशोधक व भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्रो) माजी अध्यक्ष यू.आर. राव यांचे आज (सोमवार) पहाटे निधन झाले. इस्रो वतीने विविध प्रक्षेपणांमध्ये त्यांनी विविध माध्यमांतून महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ते 85 वर्षांचे होते. 

राव यांनी पहाटे अडीच वाजता अखेरचा श्वास घेतला. हृदयविकारामुळे त्यांना या वर्षाच्या सुरवातीपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. भौतिक संशोधनातील सर्वोच्च संस्था असलेल्या इस्रोच्या शासकीय समितीचे अध्यक्ष म्हणून राव कार्यरत होते. तसेच, ते तिरुअनंतपुरम येथील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे कुलगुरूही होते. 

मागील अनेक वर्षे त्यांनी विविध संस्थांच्या सर्वोच्च पदांचा कार्यभार यशस्वीपणे सांभाळला. विदेशी विद्यापीठांमध्येही त्यांनी काम केले. आंतरराष्ट्रीय पातळीवरील दहा पुरस्कार आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 

नामांकित शास्त्रज्ञ राव यांच्या निधनाने दुःख झाले. भारताच्या अवकाश संशोधन कार्यक्रमातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. 

ई सकाळवरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 
'वाइबो'च्या ड्रॅगनचे ना फूत्कार, ना ज्वाळा! 
‘राग देश’ चित्रपट २८ ला रूपेरी पडद्यावर
कर्जमाफीसाठी राज्य सरकार सज्ज - मुख्यमंत्री
सरसकट कर्जमाफीचाच विरोधकांचा आग्रह 
व्रतवैकल्यांचा महिना...
मुख्यमंत्र्यांचे पिंपरी-चिंचवडकडे विशेष लक्ष
महापालिकेच्या रुग्णालयांसाठी आठ कोटींची औषध खरेदी 
स्वाईन फ्लूचे शहरात ५४ रुग्ण
पंचगंगेचा "पिकनिक पॉईंट' हाऊसफुल्ल 
टेम्पो भरून चला पिक्‍चरला...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ex-Isro chief and renowned space scientist Professor UR Rao passes away