
ATS Cracks Down on Ex NSG Commando Involved in Massive Marijuana Trafficking
Esakal
मुंबईवर झालेल्या 26/11च्या दहशतवादी हल्ल्यावेळी दहशतवाद्यांविरोधात लढणाऱ्या एनएसजी कमांडोला अंमली पदार्थ तस्करी प्रकरणी अटक करण्यात आलीय. एकेकाळी दहशतवाद्यांशी लढणारा कमांडो अंमली पदार्थ तस्करीकडे वळल्याच्या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. राजस्थान एटीएस आणि एएनटीएफने केलेल्या संयुक्त कारवाईत कुख्यात ड्रग्ज तस्कर आणि माजी एनएसजी कमांडो बजरंग सिंह याला रतनगढमधून अटक करण्यात आली. दहशतवाद विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने संयुक्त कारवाईत माजी एनएसजी कमांडो बजरंग सिंहला ताब्यात घेतलं.