esakal | ताजमहाल पर्यटकांसाठी खुला होणार? आग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात काय म्हटलंय?
sakal

बोलून बातमी शोधा

Taj_Mahal

आता ही सर्व स्थळे १ सप्टेंबरपासून पुन्हा नियोजित वेळेनुसार सुरू होणार आहेत, अशी माहिती आग्रा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

ताजमहाल पर्यटकांसाठी खुला होणार? आग्राच्या जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात काय म्हटलंय?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : सध्या कोरोनामुळे देशातील सर्व पर्यटनस्थळे बंद आहेत. याकाळात भारतातील पर्यटन क्षेत्र पुर्णपणे कोसळले आहे. भारतात पर्यटनावर बरेच जण अवलंबून आहेत. आज या क्षेत्रातील अनेकजणांवर जगायचे कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक व्यावसायिकांचे कार्यालयीन खर्च, रद्द झालेल्या सहलींमुळे झालेले नुकसान, विमान कंपन्या आणि अन्य ठिकाणी अडकून पडलेले पैसे, यांमुळे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, काही पर्यटन क्षेत्रातील कंपन्यांना नाईलाजाने कामगार कपात करावी लागली आहे.

बेरो​जगारांसाठी महत्त्वाची बातमी; मोबाईल उद्योग क्षेत्रात होणार आतापर्यंतची सर्वात मोठी रोजगार निर्मिती!

दरम्यान, उत्तर प्रदेशमधून एक चांगली बातमी आली आहे. उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील ताजमहाल आणि आग्रा किल्ला वगळता इतर सर्व स्मारके 'बफर झोन'च्या यादीतून वगळण्यात आली आहेत. यामुळे आता आग्रा जिल्ह्यातील ताजमहाल आणि आग्रा किल्ला सोडून बाकी सर्व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली होणार आहेत. आता ही सर्व स्थळे १ सप्टेंबरपासून पुन्हा नियोजित वेळेनुसार सुरू होणार आहेत, अशी माहिती आग्रा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. ही सर्व ठिकाणे सुट्टीचा एक दिवस वगळता आठवडाभर उघडी राहतील. पर्यटनस्थळी गेल्यावर पर्यटाकांना मास्क घालणे आणि सोशल डिस्टंसिंगचे पालन करणे बंधनकारक असणार आहे.

उत्तराखंडच्या राजकारणात 'आप'ची एन्ट्री; केजरीवाल यांची घोषणा​

जरी उत्तर प्रदेशमधील पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी खुली झाली असली तरी याला पर्यटकांचा कितपत प्रतिसाद मिळेल हे १ सप्टेंबरनंतरच कळेल. देशात एका दिवसाला ६० हजारांपेक्षा जास्त नवीन रुग्ण आढळत असताना हा महसूलवाढीसाठी घेतलेला निर्णय भविष्यात धोकादायक तर ठरणार नाही ना, हा प्रश्नही उभा राहिला आहे. कारण याअगोदर गोव्यात केलेला असाच पर्यटनाबद्दलचा प्रयोग काही प्रमाणात फसला होता.
सध्या महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रही बंद आहे.

विकास दुबे चकमक प्रकरणातील, दोन वाँटेड आरोपी शरण

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी म्हटलं होत की, ज्या वेळी हे आरोग्य संकट निघून जाईल, त्यावेळी मंदिर, दर्गा, चर्चा हे उघडण्याला प्राधान्य देऊ. मात्र, या सर्व धार्मिक स्थळांमधील स्वच्छता करण्यावर आमचा भर राहील. तिथं मेडिकल स्कॅनरही उपलब्ध करून दिले जातील, पण अर्थात, हेही उघडण्यामध्ये कुठलीही घाई केली जाणार नाही. तसेच महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्र सर्वात शेवटी उघडलं जाईल.

ताज्या बातम्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे अॅप

(Edited by : Ashish N. Kadam)

loading image
go to top