mucormycosis
mucormycosismucormycosis

तीन कारणांमुळे होतो म्युकरमायकोसिस; तज्ज्ञांनी केला उलगडा

देशातील ८० टक्के कोरोना रुग्णांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पॅरासिटामॉल आणि इतर पाच ते सात प्रकारची औषधे दिली जातात. तसेच दिवसातून २ ते ३ वेळा वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो.
Summary

देशातील ८० टक्के कोरोना रुग्णांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पॅरासिटामॉल आणि इतर पाच ते सात प्रकारची औषधे दिली जातात. तसेच दिवसातून २ ते ३ वेळा वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो.

नवी दिल्ली : देशातील कोरोनाच्या नव्या रुग्णसंख्येत मार्च-एप्रिलच्या मानाने सध्या घट होत असली तरी मृतांची संख्या वाढत आहे. त्यात आता काळ्या बुरशीची म्हणजे म्युकरमायकोसिस आजाराची भर पडली आहे. कोरोनापेक्षा घातक म्हणून सिद्ध होऊ लागलेला हा आजार काही राज्यांत महामारी म्हणून घोषित करण्यात आला आहे. म्युकरमायकोसिस विषयी तज्ज्ञांनी आतापर्यंत विविध मते नोंदवली आहेत. कोरोनाग्रस्तांवर उपचारादरम्यान झिंक, अँटिबायोटिक्स आणि वाफ यांचा अतिवापर म्युकरमायकोसिसला निमंत्रण देत असल्याची बाब एका अभ्यासातून समोर आली आहे. (excess zinc and antibiotics during coronavirus treatment behind mucormycosis outbreak)

mucormycosis
ESakal Survey : मोदी सरकारबद्दल करा तुमची 'मन की बात'

जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतात म्युकरमायकोसिसचे रुग्ण मोठ्या संख्येत सापडत आहेत. कोरोना रुग्णांवर उपचार करत असताना झिंक सप्लिमेंटचे अतिरिक्त सेवन, अँटिबायोटिक्सचा मोठ्या प्रमाणात वापर आणि वारंवार घेतली जाणारी वाफ या तीन गोष्टी बुरशीच्या वाढीला कारणीभूत ठरतात, असे इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ. राजीव जयदेवन यांनी सांगितले. इंदोरमधील महात्मा गांधी मेमोरियल गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजमधील डॉ. व्ही. पी. पांडे यांनी ४ रुग्णालयातील २१० कोरोना रुग्णांची यासाठी निवड केली होती. डॉ. पांडे यांच्या अभ्यासातून ही बाब समोर आली आहे.

mucormycosis
धक्कादायक! फक्त 18 महिन्याच्या बाळाला ब्लॅक फंगसची लागण

अझिथ्रोमायसिन, डॉक्सिसायक्लिन आणि कार्बापेनेमच्या सेवनामुळे बुरशीचा धोका वाढतो. झिंकचे प्रमाण जास्त असलेल्या वातावरणाचा बुरशी वेगाने वाढते. मॅमॅलियन पेशी झिंकला दूर ठेवून बुरशी संसर्ग टाळण्याला मदत करतात. दुसरीकडे वारंवार आणि गरजेपेक्षा जास्त वाफ घेतल्याने म्युकस लेयरचे नुकसान होते. म्युकस लेयरचे नुकसान बुरशीच्या वाढीला कारणीभूत ठरते. अशा प्रकारचे १० ते २० टक्के म्युकरमायकोसिसचे रुग्ण भारतात आढळत आहेत.

देशातील ८० टक्के कोरोना रुग्णांना शरीराचे तापमान नियंत्रित करण्यासाठी पॅरासिटामॉल आणि इतर पाच ते सात प्रकारची औषधे दिली जातात. तसेच दिवसातून २ ते ३ वेळा वाफ घेण्याचा सल्ला दिला जातो. सध्यातरी कोरोनावर उपचार करण्यासाठी कोणतेही विशिष्ट औषध उपलब्ध नाही. प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आणि लवकर बरे होण्यासाठी झिंक सप्लिमेंटची शिफारस केली जाते. झिंक शरीरातील ३०० पेक्षा जास्त एंजाइम्स सक्रिय करण्यास मदत करते. वाफ घेण्याचं तंत्र कोरोना काळात लोकप्रिय झालं. सर्दीपासून मुक्ती मिळविण्यासाठी वाफ घेणे उपयुक्त मानले जाते. पण न्युमोनिया किंवा फुप्फुसाचे इतर आजार असणाऱ्या नागरिकांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय वाफ घेऊ नये, असे तज्ज्ञांनी सांगितले.

mucormycosis
कोविशील्ड-कोवॅक्सिन लसीचं कॉकटेल; UP मधील गावात खळबळ

देशात आतापर्यंत म्युकरमायकोसिसचे ११ हजार ७१७ रुग्ण आढळले आहेत. या यादीत गुजरात टॉपला आहे. त्याखालोखाल महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. गुजरातमध्ये २ हजार ८५९, महाराष्ट्रात २ हजार ७७० तर आंध्र प्रदेशमध्ये ७६८ रुग्ण आढळले आहेत. दिल्ली, राजस्थान, उत्तर प्रदेश या राज्यांमध्येही रुग्णसंख्या वाढू लागली आहे, अशी माहिती केंद्रीय रसायने आणि खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी दिली.

वेळेवर निदान आणि योग्य उपचारांअभावी रुग्ण दगावण्याची शक्यता सर्वाधिक आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसला काही राज्यांनी महामारी म्हणून घोषित केले आहे. दुसरीकडे 'सीडीसी'ने हा आजार संसर्गजन्य नाही, अशी पुष्टी केली आहे. देशभरात म्युकरमायकोसिसचे दरवर्षी डझनभर रुग्ण आढळतात. प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्यांना याची लागण होते. याआधी अवयव प्रत्यारोपण करणाऱ्या व्यक्ती तसेच कर्करुग्णांमध्ये हा आजार प्रामुख्याने आढळून येत होता. काही वर्षांपूर्वी सार्सची साथ आली होती, त्यावेळीदेखील म्युकरमायकोसिसचे रुग्ण आढळून आले होते.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com