Akash Missile: एकाचवेळी चार टार्गेट हवेत नष्ट... हवाई दलाचे 'आकाश' गरजले; 'अशी' शक्ती असलेला भारत पहिला देश

डीआरडीओने दाखवून दिले की आकाशामध्ये एकाच वेळी चार लक्ष्ये नष्ट करण्याची ताकद भारतात आहे. हे आकाश क्षेपणास्त्रात २५ किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.
Akash Missile
Akash Missile

Akash Missile:  आपल्या स्वदेशी शस्त्रास्त्र प्रणालींची निर्यात करण्यास उत्सुक असलेल्या भारताने मोठी मजल मारली आहे. नुकत्याच झालेल्या अस्त्रशक्ती 2023 सराव दरम्यान, एकाच फायरिंग युनिटने एकाच वेळी चार मानवरहित लक्ष्ये नष्ट केली.एकाच फायरिंग युनिटचा वापर करून कमांड मार्गदर्शनाद्वारे एकाच वेळी चार लक्ष्य नष्ट करण्याची क्षमता असलेला भारत हा पहिला देश ठरला आहे. डीआरडीओने (संरक्षण संशोधन आणि विकास संघटना) आज (रविवार) आकाश क्षेपणास्त्राच्या सामर्थ्यांची माहिती दिली.

डीआरडीओने दाखवून दिले की आकाशामध्ये एकाच वेळी चार लक्ष्ये नष्ट करण्याची ताकद भारतात आहे. आकाश क्षेपणास्त्रात २५ किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता आहे.

अचूक हवाई लक्ष्य करण्याच्या शक्तीने सुसज्ज असलेल्या आकाश क्षेपणास्त्र प्रणालीची गणना अत्याधुनिक शस्त्रास्त्रांमध्ये केली जाईल, असे डिआरडीओने म्हटले आहे.

भारत हा जगातील पहिला देश आहे ज्याकडे आकाश क्षेपणास्त्र सारखे तंत्रज्ञान आणि शक्ती आहे. डीआरडीओच्या मते, एकाच फायरिंग युनिटचा वापर करून क्षेपणास्त्रे प्रक्षेपित करण्यात आणि एकाच वेळी चार लक्ष्यावर मारा करण्याची क्षमता असलेल्या देशांमध्ये भारत आघाडीवर आहे. जगातील इतर कोणत्याही देशात सध्या अशी क्षमता नाही.

Akash Missile
OBC Melawa: "ओबीसींच्या हाती सत्ता द्या, ५ वर्षात मराठ्यांची गरिबी दूर करू"; प्रकाश शेंडगेंचं आवाहन

डिआरडीओ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा फायरिंग लेव्हल रडार, फायरिंग कंट्रोल सेंटर आणि दोन आकाश एअर फोर्स लॉन्चसह तैनात करण्यात आली होती. हे प्रक्षेपक 5 क्षेपणास्त्रांनी सुसज्ज होते. (Latest Marathi News)

या सराव दरम्यान, प्रथम FLR ने हवेतील शत्रूंचा शोध घेतला आणि नंतर आकाश फायरिंग युनिटने हवेतच ते लक्ष्य नष्ट करण्याचे आदेश दिले. यानंतर कमांडरकडून आदेश जारी करण्यात आला, त्यानंतर दोन आकाश क्षेपणास्त्रांनी दोन प्रक्षेपकांमधून हवेत उड्डाण केले. त्याच वेळी, त्याच लाँचरमधून उर्वरित दोन लक्ष्ये उडविण्याचे आदेश देण्यात आले, त्यानंतर एकूण 4 क्षेपणास्त्रांनी 25 किमी अंतरावरील चारही लक्ष्ये नष्ट केली.

Akash Missile
'आधीच मर्कट, त्यात मद्य प्यायल्यासारखा बोलतो...'; छगन भुजबळांचा जरांगेंवर बोचरा वार

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com