Exit Poll 2022 : ‘एक्झिट पोल’ च्या प्रश्नाला नितीशकुमार यांची बगल

गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला
Exit Poll 2022 Nitish Kumar broke alliance BJP in Bihar formed government RJD defeat BJP in upcoming Lok Sabha elections
Exit Poll 2022 Nitish Kumar broke alliance BJP in Bihar formed government RJD defeat BJP in upcoming Lok Sabha elections

पाटणा : गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये भाजप पुन्हा सत्तेवर येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी बगल दिली. बिहारमध्ये भाजपबरोबरची युती तोडत राजदच्या साथीने सत्ता स्थापन करणाऱ्या नितीशकुमारांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा निर्धार केला आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये भाजपला काँग्रेसपेक्षा थोड्या अधिक जागा मिळण्याचाही अंदाज आहे. या ‘एक्झिट पोल’बाबत पत्रकारांनी नितीशकुमार यांना विचारले असता त्यांनी ‘जनताच मालक आहे,’ असे सांगत उत्तर देण्याचे टाळण्याचा प्रयत्न केला. पत्रकारांनी आणखी विचारले असता त्यांनी मी अशा बाबतीत कधी काही बोलतो का, असा सवाल केला. निकाल लागेपर्यंत सर्वांनीच वाट पाहायला हवी, असेही ते म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com