
हवामान बदलापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आता जनुकीय बदलाचा (जीन एडिटिंग) पर्याय निवडला आहे. त्याचा प्रयोग गायीवर केला असून या प्रयोगाच्या मदतीने अनुवांशिकरित्या सुधारित गायींची पैदास केली आहे.
ऑकलंड - हवामान बदलापासून जनावरांचा बचाव करण्यासाठी शास्त्रज्ञांनी आता जनुकीय बदलाचा (जीन एडिटिंग) पर्याय निवडला आहे. त्याचा प्रयोग गायीवर केला असून या प्रयोगाच्या मदतीने अनुवांशिकरित्या सुधारित गायींची पैदास केली आहे.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
एरव्ही गायीच्या अंगावर काळे ठिपके दिसतात, परंतु शास्त्रज्ञांनी जनुकीय बदल करत अंगावरील काळ्या ठिपक्यांचे रुपांतर करड्या ठिपक्यात केले आहे. न्यूझीलंडच्या रुआकुरा संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या मते, हवामान बदलामुळे तापमानात वाढ होऊ लागली आहे. मात्र आता तापमान वाढले तरी जनावरांना त्याचा फारसा त्रास होणार नाही. कारण गायीच्या अंगावरील करडा ठिपका वातावरणातील उष्णता शोषण्याचे काम करेल. या बदलाने जनावरांना दिलासा मिळेल व दुग्धोत्पादन आणि प्रजनन क्षमतेवर परिणाम होणार नाही. जनुकीय बदलाच्या मदतीने डीएनएमध्ये बदल करता येतो.
इस्लामिक स्टेटच्या संपर्कातील दोघे ताब्यात; 14 जणांना पाठवले सीरियाला
सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास गर्भातील खराब झालेली त्वचा पेशी काढून टाकण्यात आली. जेणेकरून पुढच्या पिढीवर विपरित परिणाम होऊ नये. या तंत्राच्या आधारे अनुवांशिक आजार असलेल्या रुग्णात सुधारणा होण्याची शक्यता वाढते.
हवामान बदलाचा परिणाम
वातावरणातील बदलामुळे उन्हाळ्यात सरासरीपेक्षा अधिक तापमान वाढते. त्याचा परिणाम जनावर, प्राण्यांवर होतो. उष्मा वाढल्याने जनावरांचा आहार कमी होतो. दूध कमी राहते आणि प्रजनन क्षमता देखील घटते.
बिहारमध्ये एनडीएचं जागावाटप ठरलं; जदयू 122 तर भाजप 121 जागांवर लढणार
अशी तयार झाली जेनेरिक गाय
शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत जनुकीय बदल करत गर्भातील खराब भाग काढून टाकला. हा भाग अंगावर काळ्या रंगाचे ठिपके तयार करण्यास जबाबदार होता. त्यानंतर या गर्भाला गायीत स्थानांतरित केले. या गायीने दोन वासरांना जन्म दिला. चार महिन्यानंतर दोनपैकी एका वासराचा मृत्यू झाला. परंतु गर्भातच जनुकात बदल केल्याने दुसऱ्या वासराच्या अंगावर करड्या रंगाचे ठिपके दिसत होते.
हवामान बदलाचा परिणाम काय
शास्त्रज्ञांच्या मते, गायीच्या अंगावरील काळा रंगाचे वर्तुळ हे सूर्याचे तापमान अधिक प्रमाणात शोषून घेते. जेव्हा सूर्याची किरणे जनावराच्या अंगावर पडतात, तेव्हा काळे ठिपके अधिक उष्णता शोषून घेते आणि जनावराच्या अंगात उष्णता वाढते. या उष्णतेचा परिणाम जनावरातील दूधाच्या प्रमाणावर आणि वासरांना जन्म देण्याच्या क्षमतेवर होतो.
हे वाचा - सोशल डिस्टन्सिंगसाठी नवीन फॉर्म्युला; संसर्गाच्या जोखमीबाबत WHO च्या आयोगाचा अभ्यास
उष्णता कितपत धोकादायक
संशोधकांच्या मते, उन्हाळ्यात दुग्धोत्पादन केंद्रावर असणारी जनावरे २५ ते ६५ अंश फरनाइट तापमान सहन करतात. मात्र जेव्हा हेच तापमान ८० अंशांवर पोचते तेव्हा उष्णता वाढते. परिणामी जनावरांचा आहार कमी होतो. त्याचा परिणाम दूधाचे उत्पादन घसरते. उष्णतेमुळे प्रजनन क्षमतेवर देखील परिणाम होतो. म्हणूनच न्यूझीलंडचे शास्त्रज्ञ याच समस्येचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
Edited By - Prashant Patil