
सेवानिवृत्तीनंतर सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पैशांत कपात करता येणार नाही - सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : काही चुकांमुळे सरकारी कर्मचाऱ्यांना झालेले अधिकचे पेमेंट सेवानिवृत्तीनंतर वसूल करता येऊ शकत नाही असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्याला गेलेले जास्तीचे पेमेंट आता कोणत्याही कारणास्तव वसूल केले जाऊ शकत नाही असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे.
न्यायमूर्ती एस.ए. नजीर आणि न्यायमूर्ती विक्रम नाथ म्हणाले की, अतिरिक्त पेमेंटच्या वसुलीला स्थगिती देण्यास न्यायालयांनी परवानगी दिली आहे. कर्मचार्यांच्या होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यासाठी ही स्थगिती देण्यात आल्याचं न्यायालयाने सांगितलं आहे.
हेही वाचा: स्वराज्याचं वैभव असलेल्या दुर्गदुर्गेश्वर रायगडाला उद्ध्वस्त कुणी केलं?
खंडपीठाने सांगितले की, जर कर्मचार्याच्या कोणत्याही चुकीच्या माहितीमुळे किंवा फसवणुकीमुळे अतिरिक्त रक्कम भरली गेली नसेल आणि जर वेतन आणि भत्त्यांच्या गणनेसाठी चुकीचे तत्त्व लागू करून किंवा नियमाच्या कोणत्याही विशिष्ट व्याख्येच्या आधारे अतिरिक्त पेमेंट केले असेल जे नंतर चुकीचे असल्याचे आढळून आले असेल, तर केले गेलेले जास्तीचे पेमेंट कर्मचाऱ्याच्या सेवानिवृत्तीनंतर वसूल करता येणार नाही.
हेही वाचा: "राणे, राणा अन् राज"; भुजबळांनी सांगितलं RRR कनेक्शन
आपल्या आधीच्या निकालांचा संदर्भ देत सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, सरकारी नोकर, विशेषत: जे निवृत्तीच्या सेवेच्या शेवटच्या टप्प्यात आहेत त्यांनी आपल्याला मिळालेली रक्कम खर्च करावी. परंतु जर कर्मचार्याला माहिती असेल की मिळालेले पेमेंट देय रकमेपेक्षा जास्त आहे किंवा चुकीचे पेमेंट केले गेले आहे त्यावेळी याची वसुली करता येणार आहे असं न्यायालयाने सांगितलं आहे.
केरळचे रहिवासी थॉमस डॅनियल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठाने हा निकाल दिला आहे, ज्यांना जिल्हा शिक्षण अधिकाऱ्यांनी 1999 मध्ये सेवानिवृत्तीनंतर त्यांना दिलेले वेतन आणि वाढ परत करण्यास सांगितले होते. त्यावरुन त्यांनी ही याचिका दाखल केली होती.
Web Title: Extra Payment Paid By Company Cannot Be Recovered
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..