फेसबूकने २०१९मध्ये जाणीवपूर्वक पसरवला द्वेष - रिपोर्ट

फेसबूकने मुस्लील विरोधी भाषणं आणि व्हीडिओला दिले प्रोत्साहन - रिपोर्ट
Facebook
Facebook Team eSakal
Updated on

भारतात २०१९ साली लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या. या निवडणुकांच्या काही दिवस आधीच फेसबूकच्या दोन कर्मचाऱ्यांनी एक बनावट फेसबूक अकाऊंट तयार केलं. भारतामध्ये फेसबूक युजरला फेसबूकवर नेमकं काय दिसतं हे पाहण्यासाठी उत्तर भारतातील २१ वर्षीय महिलेच्या नावाने हे अकाऊंट तयार केले. या अकाऊंटच्या माध्यमातून त्यांनी फेसबूक फीडमध्ये नेमकं काय दिसतं हे पाहण्यास सुरूवात केली.

फेसबूक कर्मचाऱ्यांनी केलेल्या निरीक्षणात सुरुवातील या महिलेला अश्लील व्हीडिओ पाहायला मिळाले. त्यानंतर काही हिंसक गोष्टी पाहायला मिळाल्या. पूढे याच अकाऊंटवर त्यांना काश्मीरमधील हिंसक घटनांचे व्हीडिओ, तसेच भारत पाकिस्तान वादाशी संबंधीत गोष्टी पाहायला मिळाल्या. मात्र जेव्हा एक ताकदवान नेता म्हणून नरेंद्र मोदी यांच्या प्रचाराला सुरुवात झाली तेव्हा त्यांच्या या फेसबूक अकाऊंटवर भारताने पाकीस्तानमधील दहशतवादी तळांवर केलेली एअर स्ट्राईक सारख्या गोष्टी दिसून आल्याचे द वॉशींग्टन पोस्टमधून समोर आले आहे.

Facebook
'जम्मूतील लोकांवरील अन्याय संपला आहे, हे सांगण्यासाठी मी आलो'

काहीच केलेले नसताना त्यांना या अकाऊंटवर नरेंद्र मोदींच्या समर्थनातील आणि मुस्लीम विरोधी वादग्रस्त भाषणं दिसू लागली. "300 पाकिस्तानी कुत्रे मरण पावले" वगैरे सारखे मेसेज दिसू लागले. वॉशिंग्टन पोस्टमधून समोर आलेल्या अहवालात फेसबुकच्या या डमी चाचणीला "integrity nightmare" असे म्हटले गेले आहे. या चाचणीमधून भारतातील आणि अमेरिकेतील वापरकर्त्यांना फेसबूकवर दिसणाऱ्या गोष्टींमध्ये काय फरक आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला.

Facebook
पूंछमध्ये दहशतवाद्यांचा खेळ खल्लास; ऑपरेशन शेवटच्या टप्प्यात

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com