Boiler Explosion: फार्मा कंपनीत बॉयलरचा स्फोट, ५ कामगारांचा होरपळून मृत्यू, १० जण गंभीर जखमी; अनेक कामगार अडकल्याची भीती
Tirupati Boiler Explosion: फार्मा कंपनीत बॉयलरचा स्फोट झाल्याची घटना घडली आहे. या घटनेत ५ कामगारांचा मृत्यू झाला असून १० जण गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे.
आंध्र प्रदेशातील तिरुपतीजवळ भीषण दुर्घटना घडली आहे. एका कारखान्यात बॉयलरचा स्फोट झाल्यामुळे ५ हुन अधिक कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १० हून अधिक कामगार गंभीररीत्या जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.