रेप झालाच नाही! DNA मुळे तरुणाची 7 वर्षांनी निर्दोष सुटका; तरुणी देणार नुकसान भरपाई

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 21 November 2020

कॉलेज विद्यार्थी असणाऱ्या संतोषला पोलिस अधिकाऱ्यांनी बलात्काराच्या खोट्या आरोपात अटक केली होती.

चेन्नई- बलात्काराच्या एका खोट्या प्रकरणात (False Rape Case)  फसवण्यात आलेल्या एका तरुणाला 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. चेन्नईतील ही घटना आहे. संतोष नावाच्या एका युवकाने तक्रार दाखल केली होती की, एका खोट्या केसमुळे त्याचे करिअर आणि जीवन उद्धवस्त झाले आहे. संतोषने याप्रकरणी मुलगी, तिचा परिवार आणि प्रकरणाची चौकशी करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करत 30 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी केली होती. 

काय होते प्रकरण? 

त्यावेळी कॉलेज विद्यार्थी असणाऱ्या संतोषला पोलिस अधिकाऱ्यांनी बलात्काराच्या खोट्या आरोपात अटक केली होती. तरुणाविरोधात तब्बल 7 वर्ष खटला चालला. त्यानंतर, डीएनए टेस्ट (DNA Test) मधून कळालं की मुलीने ज्या बाळाला जन्म दिलाय ते संतोषचे नाहीये. त्यानंतर संतोषने याचिका दाखल केली की, खोट्या बलात्काराच्या आरोपामुळे माझे करिअर आणि जीवन पूर्णपणे उद्धवस्त झालं आहे. तरुणाच्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मुलगी आणि तिच्या आई-वडिलांना 15 लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. 

खुशखबर! ओप्पो देतंय नव्या मॉडेल्सवर घसघशीत सूट; जाणून घ्या किंमती

संतोष आणि मुलगी शेजारीशेजारी राहायचे, शिवाय ते एकाच समुदायातून येत होते. सुरुवातीला असं ठरण्यात आलं होतं की दोघांचे लग्न लावण्यात येईल, पण त्यानंतर संपत्तीच्या काही वादामुळे दोन्ही परिवार वेगळे झाले. त्यानंतर संतोषचे कुटुंबीय चेन्नईत दुसरीकडे शिफ्ट झाले. यादरम्यान संतोषने बीटेकला अॅडमिशन घेतले. त्यानंतर मुलीच्या आईने तरुणाच्या घरी जाऊन आरोप केला की, ''त्याने त्यांच्या मुलीला गर्भवती केले आहे आणि लवकरात लवकर त्याने तिच्याशी लग्न करावे.'' 

संतोषने असले कोणतेही संबंध प्रस्थापित केल्याचे नाकारले. त्यानंतर मुलगी आणि तिच्या कुटुंबीयांनी संतोषविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर संतोषला अटक करण्यात आली आणि 95 दिवसांसाठी तुरुंगात टाकण्यात आले. तरुणाला 12 फेब्रुवारी 2010 मध्ये जामीन मिळाला आणि यादरम्यान मुलीने एका बाळाला जन्म दिला. डिएनए टेस्टमधून खुलासा झालाय की ते बाळ संतोषचे नाही. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: false report against youth girl will give compensation