esakal | खुशखबर! ओप्पो देतंय नव्या मॉडेल्सवर घसघशीत सूट; जाणून घ्या किंमती
sakal

बोलून बातमी शोधा

OPPO

Oppo ने आपल्या काही स्मार्टफोन्सच्या किंमतीमध्ये मोठी घट केली आहे

खुशखबर! ओप्पो देतंय नव्या मॉडेल्सवर घसघशीत सूट; जाणून घ्या किंमती

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- Oppo ने आपल्या काही स्मार्टफोन्सच्या किंमतीमध्ये मोठी घट केली आहे. कंपनीने ए सीरिज, एफ सीरिज आणि रेनो 3 प्रो स्मार्टफोन्सच्या किंमती कमी केल्या आहेत. Oppo A12, Oppo A15, Oppo F17 आणि Oppo Reno 3 Pro स्मार्टफोनस जवळपास 2 हजार रुपयांच्या घसघशीत सुटसोबत खरेदी करता येणार आहे. महेश टेलिकॉमने ओप्पो फोन्सच्या किंमतीत घट केल्याचे सर्वात आधी ट्विट करुन सांगितले होते. 

500 रुपयांच्या आतील सर्वोत्तम प्रीपेड प्लॅन, वाचा...

ओप्पो ए12 आणि ओप्पो ए15 च्या किंमतीमध्ये 1 हजार रुपयांची घट करण्यात आली आहे. ओप्पो ए12 च्या 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या फोनला 1000 रुपयांचा सूटसोबत 8,990 रुपयांना खरेदी केले जाऊ शकते. ओप्पो ए15 च्या 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेजच्या फोनवर 1000 रुपयांची सूट देऊन 8,990 रुपयांना विकत घेता येईल. ए15 च्या 3 जीबी रॅमच्या 32 जीबी स्टोरेजच्या फोनवर 1 हजार रुपयांची सूट असून 9,990 रुपयांना तो खरेदी करता येईल. 

नुकतेच लाँच करण्यात आलेल्या ओप्पो एफ17 च्या 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इनबिल्ड स्टोरेज असलेल्या स्मार्टफोनवर 500 रुपयांची सूट आहे. हा मोबाईल 18,490 रुपयांना मिळू शकेल. ओप्पो रेनो 3 प्रो च्या 8 जीबी रॅमच्या आणि 128 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनवर 1000 रुपयांची सूट देण्यात आली असून 24,990 रुपयांना खरेदी करण्याची संधी आहे. याच हँडसेटच्या 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजच्या स्मार्टफोनवर 2 हजार रुपयांची सूट दिली जात असून फोन 27,990 रुपयांना मिळू शकेल.

खुशखबर! PUBGचं भारतात 'कमिंग सून', सोशल मीडियावर टिझर लाँच

कंपनीने या आठवड्यात ओप्पो ए33 फोनची किंमतही कमी केली आहे. कंपनीने ओप्पो ए33 च्या किंमतीमध्ये 1 हजार रुपयांनी घट केली आहे. स्मार्टफोन आता 10,990 रुपयांना उपलब्ध होऊ शकणार आहे. ओप्पो ए33 फोन मागील आठवड्यात 11,990 रुपये किंमतींना लाँच करण्यात आला होता. ओप्पोच्या या फोनमध्ये 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इनबिल्ड स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 430 ऑक्टा-कोर प्रोसेसर आहे. हँडसेट एँड्रोइड बेस्ड कलरओएसवर चालते.  

loading image
go to top