
Viral Video Shows Family Taking Train Blankets
Esakal
Viral Video: ट्रेनमध्ये सोयीसुविधा नसल्याची तक्रार नेहमीच प्रवाशांकडून केली जाते. सीट कव्हर खराब झालेले असतात, स्वच्छता नसते, पाण्याचे नळ नादुरुस्त असतात अशा एक ना अनेक तक्रारी असतात. दरम्यान, आता एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ट्रेनच्या एसी कोचमधून प्रवास करणाऱ्या एका कुटुंबाने चक्क ३ चादरी चोरी केल्या. कुटुंब प्लॅटफॉर्मवर उतरताच तिकिट तपासनीसाने त्यांना पकडल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. धक्कादायक बाब म्हणजे कुटुंबाने चादरी चोरी केल्या हे मान्य केलं नाही, याऊलट तिकीट तपासनीसालाच बडबडायला लागले.