
Fadnavis Blames Thackeray Govt for Delay in Thane Metro
Esakal
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रो ४ आणि ४-अ वरील मेट्रोची ट्रायल घेण्यात आली. वडाळा, घाटकोपर, मुलुंड, कासरवडवली, गायमुख या महत्त्वाच्या मार्गातील मेट्रोचा पहिला टप्पा ठाणेकरांसाठी महत्त्वाचा आहे. ३५ किमी इतकी लांबीच्या या टप्प्यात ३२ स्थानकं यात आहेत. यासाठी १६ हजार कोटींचा खर्च करण्यात आलाय. दैनंदिन प्रवासी संख्या १३ लाख ४३ हजार इतकी असेल अशी अपेक्षा मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केली.