Siddhu Moosewala
Siddhu MoosewalaSakal

मूसेवाला यांना साश्रुनयनांनी निरोप

चाहत्यांची गर्दी; आवडीच्या ट्रॅक्टरवर काढली अंत्ययात्रा
Published on

नवी दिल्ली - प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (वय २८) यांना आज साश्रुनयनांनी निरोप देण्यात आला. मानसा जिल्ह्यातील मूसागाव येथील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार करण्यात आले. मूसेवाला यांच्या अंत्ययात्रेत चाहत्यांची गर्दी उसळली होती. मूसेवाला यांचे वडील बलकोर सिंग आणि आई चरण कौर यांनी आपल्या गायक पुत्राला निरोप देण्यासाठी आलेल्या हजारो चाहत्यांना अभिवादन केले.

मूसेवाला यांच्या अंत्ययात्रेत आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पंजाब सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मूसेवाला यांची सुरक्षा काढून घेणे आणि त्याची माहिती सार्वजनिक केल्याबद्दल सरकारबाबत संताप आणि नाराजी व्यक्त करण्यात आली. आई-वडिलांची ढासळलेली मनःस्थिती पाहून लोकांचे मन हेलावले. तत्पूर्वी मानसा शासकीय रुग्णालयात काल त्यांच्या पार्थिवाचे पोस्टमार्टेम करण्याचे आले. आज सकाळी त्यांचे पार्थिव कुटुंबीयांच्या हवाली करण्यात आले. मूसेवाला यांची अंत्ययात्रा त्यांचे आवडीचे ५९११ ट्रॅक्टरवर काढण्यात आली. मूसेवाला यांनी अनेक पंजाबी गीतात याच ट्रॅक्टरचा उल्लेख केला होता. यात बदल करून त्यांनी घरातच ठेवले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com