Farm Laws: सोशल मीडियावर शीख टार्गेट; फेक अकाऊंट्सचा पर्दाफाश! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farm laws: शेतकऱ्यांचा वर्षभराचा संघर्ष
Farm Laws: सोशल मीडियावर शीख टार्गेट; फेक अकाऊंट्सचा पर्दाफाश!

Farm Laws: सोशल मीडियावर शीख टार्गेट; फेक अकाऊंट्सचा पर्दाफाश!

नवी दिल्ली : कृषी कायद्यांना विरोध करणारे शेतकरी हे प्रामुख्याने पंजाबमधील आहेत. याच कारणामुळं कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसह केंद्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरलेल्या या शेतकऱ्यांना सोशल मीडियातून जाणीवपूर्वक टार्गेट करण्यात आल्याचं आता उघड झालं आहे, अशी सुमारे ८० फेक अकाउंट्स सस्पेंड करण्यात आली आहेत. ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्राम ही अकाउंट्स चालवण्यात आली होती. बीबीसीनं एका अहवालाच्या हवाल्यानं याबाबत वृत्त दिलं आहे.

हेही वाचा: एसटी संप मिटणार? सायंकाळी सहा वाजता अनिल परब करणार मोठी घोषणा

सेंटर फॉर इन्फॉर्मेशन रेझिलन्स (सीआयआर) या संघटनेसाठी बेंजामिन स्ट्रीक यांनी तयार केलेल्या संशोधन अहवालानुसार, ट्विटर, फेसबूक आणि इन्स्टाग्रामवरुन हिंदू राष्ट्रवाद तसेच केंद्र सरकारच्या बाजूने माहिती पोस्ट करण्यात येत होती. या नेटवर्कच उद्दिष्ट शीख स्वातंत्र्य, मानवी हक्क आणि मूल्यांवरील महत्त्वाच्या मुद्द्यांवरच्या धारणा बदलणे असल्याचे दिसतं. पण या नेटवर्कचा थेट सरकारशी संबंध असल्याचे पुरावे समोर आलेले नाहीत.

#RealSigh, #FakeSikh हॅशटॅग चालवले

ही फेक प्रोफाईल्स #RealSigh, #FakeSikh ही हॅशटॅग चालवत होते. यामध्ये #RealSigh या हॅशटॅगमार्फत शीखांना पाठिंबा दर्शवला जात होता तर #FakeSikh या हॅशटॅगमार्फत शीखांविरोधात माहिती पसरवली जात होती. यामध्ये असंही दिसून आलंय की, या नेटवर्कमधील अनेक अकाउंट्सची नावं, फोटो, कव्हर फोटोही सारखीच आहेत. यांपैकी अनेक अकाउंट्सला सेलिब्रेटिंचे फोटो वापरण्यात आले आहेत. यामध्ये पंजाबी चित्रपटसृष्टीशीसंबंधीत अभिनेत्रींच्या फोटोंचा समावेश आहे.

हेही वाचा: "एसटीचं विलिनिकरण होऊ शकतं, पण...";शरद पवारांनी व्यक्त केली भीती

बीबीच्या वृत्तानुसार, यांपैकी आठ सेलिब्रेटिंशी प्रत्यक्ष संपर्क साधण्यात आला तेव्हा हे उघड झालं की, त्यांची सोशल मीडिया अकाउंट्स चालवणाऱ्या मॅनेजमेंटला त्यांच्या क्लायंटच्या फोटोंचा अशा प्रकारचा वापर केला जात असल्याचं माहिती नव्हतं. तसेच दुसऱ्या एका सेलिब्रेटिच्या मॅनेजमेंटनं सांगितलं की, संबंधित सेलिब्रेटिच्या नावे अशा प्रकारची शेकडो फेक अकाउंट्स आहेत.

फेक प्रोफाईल्समागे राजकीय प्रेरणा?

गेल्या वर्षी याच महिन्यात सुरु झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान या फेक अकाउंट्सच्या नेटवर्कद्वारे अनेक देशकांपूर्वी तयार झालेल्या 'खलिस्तान स्वातंत्र्य चळवळ' विशेष करुन चर्चिली गेली. शेतकऱ्यांचं हे आंदोलन खलिस्तानवादी दहशतवाद्यांकडून हायजॅक केल्याचंही यावेळी बोललं गेलं. यावर सरकारकडूनही दावा करण्यात आला होता की, शेतकऱ्यांचं निषेध आंदोलनामध्ये खलिस्तान्यांची घुसखोरी झाली आहे. दरम्यान, या आंदोलनात सहभागी झालेल्या ३० शेतकरी संघटनांपैकी एक असलेल्या भारतीय किसान युनियनचे नेते जगजीत सिंग दालेवाल यांनी म्हटलं की, "आम्हाला विश्वास आहे की, ही अकाउंट्स सरकारच्या इशाऱ्यावर तयार करण्यात आली होती आणि आंदोलनाविरोधात याद्वारे काही गैरसमज पसरवण्यात येत होते."

काही अकाउंट्सवरुन तर युके आणि कॅनडातील ज्यू समाजाकडून खलिस्तानवादी चळवळीला आश्रय देणारे म्हणून संबोधलं आहे. या अकाउंट्सना हजारो फॉलोवर्स होते, यावरील पोस्टला हजारो लाईक्सही होत्या तसेच अनेक न्यूज पोर्टल्सनीही आपल्या बातमीसाठी या अकाउंट्सचा अधिकृत कोटेशन म्हणून वापर केला होता.

loading image
go to top