esakal | वाहतूक शेतकऱ्यांनी नाही तर सरकारनेच बंद केलीय - राकेश टिकैत
sakal

बोलून बातमी शोधा

rakesh tikait

विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असल्यानं आंदोलन राजकीय असल्याचा आरोप केला जात आहे. यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर दिलं आहे.

वाहतूक शेतकऱ्यांनी नाही तर सरकारनेच बंद केलीय - राकेश टिकैत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - केंद्राच्या कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. कृषी कायदे मागे घ्या या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. दरम्यान, प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीवेळी हिंसाचार झाला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना रोखण्यासाठी आता सरकारकडून मार्ग बंद केले जात आहेत.

आंदोलन सुरु असलेल्या ठिकाणचे इंटरनेट बंद करण्यात आले असून वीज-पाणी इत्यादी सुविधाही बंद करण्यात आल्या आहेत. याशिवाय मार्गावर मोठे खिळे ठोकून ते बंद करण्यात आलं आहे. भक्कम अशा बॅरिकेडिंमुळे सरकारवर आता विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे.

विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळत असल्यानं आंदोलन राजकीय असल्याचा आरोप केला जात आहे. यावर शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी उत्तर दिलं आहे. टिकैत म्हणाले की, शेतकरी आंदोलनाला विरोधी पक्षांना पाठिंबा दिला तर आम्हाला काहीच अडचण नाही. पण त्यांनी राजकारण करू नये. नेते आलेत तर आम्ही काहीच करू शकत नाही. 

हेही वाचा - 'सरकारनं भींती उभारायचं काम करु नये'; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

शेतकरी आंदोलनामुळे वाहतूक व्यवस्था प्रभावित झाल्याचा आरोपही करण्यात आले आहेत. शेतकरी रस्त्यावर ठिय्या मारून आहेत त्यामुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे असं म्हटलं जात आहे. हा आरोप फेटाळून लावताना शेतकरी नेते राकेश टिकैत म्हणाले की, वाहतूक शेतकऱ्यांनी बंद केलेली नाही. आम्हाला रोखण्यासाठी पोलिसांनी बॅरिकेड्स लावली आहेत. त्यामुळेच वाहतूक बंद झाली असल्याचं भारत किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी म्हटलं.

हेही वाचा - Farmers Protest : 6 फेब्रुवारीला देशव्यापी चक्का जाम; आंदोलन होणार आणखी तीव्र

काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सरकारने उभं केलेल्या बॅरिकेडींगची दृश्ये आहेत. यामध्ये भींती लोखंडी बॅरिकेड्स तसेच मोठे टोकदार खिळे लावण्यात आले आहेत. जेणेकरुन शेतकऱ्यांना दुसऱ्या बाजूला जाताच येऊ नये. या बॅरिकेडींच्या पलीकडे पोलिसांचा मोठा फौजफाटा सुसज्जरित्या तैनात आहे. हे दृश्य असं आहे की जणू काही सरकारचं शेतकऱ्यांविरुद्ध युद्धच सुरु आहे. असं ट्विट प्रियंका गांधी यांनी केलं आहे.