esakal | आम्ही का परत जावं? ‘टाईम’ च्या मुखपृष्ठावर महिला शेतकरी

बोलून बातमी शोधा

time magazine cover.}

‘आम्हाला धमक्‍या दिल्या जाऊ शकत नाहीत व आम्हाला खरेदी केले जाऊ शकत नाही,’ या ओळींतून आंदोलन संपविण्यासाठी करण्यात आलेल्या कारवायांचीच झलक पहायला मिळते.

आम्ही का परत जावं? ‘टाईम’ च्या मुखपृष्ठावर महिला शेतकरी
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली - ‘आम्हाला कोणी धमकावू शकत नाही, आम्हाला कोणी खरेदी करू शकत नाही’, या ओळींसह जगप्रसिद्ध ‘टाईम’ नियतकालिकाच्या मुखपृष्ठावर दिल्लीच्या सीमांवरील आंदोलनकर्त्या महिला शेतकऱ्यांना स्थान मिळाले आहे. ‘टाईम’च्या ताज्या अंकात शेतकरी आंदोलनाचा वृत्तांत असून मुखपृष्ठावर आंदोलनकर्त्या महिलांच्या छायाचित्राखाली वरील निर्धाराची ओळ टाकण्यात आली आहे. ‘ऑक्‍सफेम इंडिया’च्या अहवालानुसार भारतात ८५ टक्के ग्रामीण महिला शेतीच्या कामांत सक्रिय असतात. मात्र केवळ १३ टक्के महिलांकडे शेतीची मालकी आहे. या आंदोलनाकडे जगभरातील प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले गेले. अनेक जागतिक माध्यमांच्या प्रतिनिधींनी दिल्लीच्या सीमांवर नियमितपणे जाण्याचा शिरस्ता सतत सुरू ठेवला आहे. त्यानंतर आता ‘टाईम’च्या मुखपृष्ठावरच शेतकरी आंदोलन झळकले आहे. 

छायाचित्रात टिकरी सीमेवरील २० महिला आंदोलकांचे छायाचित्र आहे. या आंदोलनात महिलांचाही सहभाग किती व्यापक व मनापासून आहे, हे ‘टाईम’च्या वृत्तांतात म्हटले आहे. ‘आम्हाला धमक्‍या दिल्या जाऊ शकत नाहीत व आम्हाला खरेदी केले जाऊ शकत नाही,’ या ओळींतून आंदोलन संपविण्यासाठी करण्यात आलेल्या कारवायांचीच झलक पहायला मिळते.

हे वाचा - भारतीयांच्या हाती अमेरिकेची सूत्रे; राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी केलं कौतुक

‘काले कानून वापस लो’, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या देशभरातील हजारो शेतकऱ्यांना जगभरातून वाढता पाठिंबा मिळत असल्याचे हे आणखी एक उदाहरण मानले जाते. गेल्या चार महिन्यांपासून सुरू असलेल्या आंदोलनात एकीकडे सरकारने शेतकरी नेत्यांबरोबर चर्चेच्या ११ फेऱ्या केल्या. कायदे मागे घेणार नाही, ही भूमिका सरकारने कायम ठेवल्याने त्या निष्फळ ठरल्या.

दुसरीकडे आंदोलकांबाबत वेगवेगळी माहिती सरकारच्या गोटातून पसरविली गेली. शेतकरी काय खातात, इथपासून या आंदोलनात देशविघातक शक्तींचा सहभाग असल्याचा प्रचार अनेक केंद्रीय मंत्र्यांकडून सुरू होता व आहे. २६ जानेवारीच्या लाल किल्यावरील हिंसाचारानंतर आंदोलनच संपणार अशी कुजबूज सुरू झाली. मात्र इतका दुष्प्रचार करूनही हजारो शेतकऱ्यांचा निर्धार पक्का असल्याचे दिसून आले.

हे वाचा - न्यूझीलंडमध्ये भूकंपाचे हादरे; त्सुनामीच्या शक्यतेची दिली सूचना​

आम्ही परत का जावे?
या आंदोलनात पंजाब, हरियाना व ग्रामीण उत्तर प्रदेशांतून मोठ्या संख्येने महिला जमल्या आहेत. मात्र आंदोलनाच्या नेतृत्वात त्यांना सहभागी करून घेतले गेले नाही काय? असाही मुद्दा यात उपस्थित करण्यात आला. रामपूरहून आलेल्या ७४ वर्षीय जसबीर कौर यांनी ‘टाईम’च्या प्रतिनिधीला ‘हे केवळ पुरूषांचेच आंदोलन नाही. आम्ही कोण आहोत, येथे का आलो आहोत? आम्ही का परत जावे?’ असा सवाल केला.