esakal | शेतकरी झुकणार नाहीत; 2024 पर्यंत आंदोलन करण्याची तयारी
sakal

बोलून बातमी शोधा

farmers protest

 दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. गुरुवारी ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढू असं म्हटलं आहे.

शेतकरी झुकणार नाहीत; 2024 पर्यंत आंदोलन करण्याची तयारी

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलनाची धार आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. गुरुवारी ट्रॅक्टर रॅली काढल्यानंतर शेतकऱ्यांनी प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर रॅली काढू असं म्हटलं आहे. तसंच शेतकऱ्यांनी असा इशारा दिला आहे की, ते मे 2024 पर्यंत आंदोलन करण्यासाठी तयार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सरकारचा कार्यकाळ 2024 ला पूर्ण होणार आहे. तर शेतकऱी आणि सरकारमध्ये 8 जानेवारीला पुढची बैठक होणार आहे. 

भारतीय किसान युनियनचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनी सांगितलं की,'आम्ही सरकारला इशारा देण्यासाठी ही रॅली काढत आहे. 26 जानेवारीलासुद्धा ट्रॅक्टर रॅली काढणार आहे. आम्ही मे 2024 पर्यंत आंदोलनासाठी तयार आहे.' याशिवाय जय किसान आंदोलनाचे नेते योगेंद्र यादव यांनी 26 जानेवारीच्या रॅलीचा उल्लेख केला होता. सिंघु बॉर्डरवर यादव यांनी सांगितलं होतं की, सध्याच्या रॅली या 26 जानेवारीचा ट्रेलर असतील. 

हे वाचा - शेतकऱ्यांची ट्रॅक्टर रॅली सुरु; प्रजासत्ताक दिनी सरकारवर दबाव आणण्याची रंगीत तालीम

गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये हजारो शेतकऱ्यांनी भाग घेतला आहे. पोलिसांनी म्हटलं की यावेळी जवळपास 2500 ट्रॅक्टर रस्त्यावर असतील. सोमवारी शेतकरी आणि सरकारमध्ये 7 वी बैठक पार पडली होती. यातही काही तोडगा निघू शकला नाही. शेतकऱ्यांनी या बैठकीत कायदे मागे घेण्याची आणि एमएसपी गॅरंटी कायद्याची मागणी केली होती. 

हे वाचा - देशाच्या गतीमान विकासासाठीचा कॉरिडॉर; PM मोदींच्या हस्ते लाँग हॉल कंटेनर ट्रेनचा शुभारंभ

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला प्रश्न विचारला की, कोरोनाच्या संकटात निजामुद्दीन मरकजमधून काय धडा घेतलात? जर काळजी घेतली नाही तर आंदोलनामुळे शेतकऱ्यांबाबतही अशीच अवस्था होऊ शकते. तुम्ही आम्हाला सांगा की हे काय चाललं आहे. आंदोलनावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेतली जात आहे की नाही असे विचारले असता सॉलिसिटर जनरने नाही असं उत्तर दिलं. 

loading image
go to top