Mahadev jankar and Raju Shetty Arrested
sakal
नवी दिल्ली -भारत आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या प्रस्तावित 'मुक्त व्यापार करारा'ला (India-US Trade Deal) विरोध करण्यासाठी दिल्लीतील किसान घाट येथे देशव्यापी आंदोलन करण्यासाठी निघालेल्या हजारो शेतकऱ्यांवर दिल्ली आणि हरियाणा पोलिसांनी तीव्र दडपशाही सुरू केली आहे. 'देश बचाओ मोर्चा' च्या बॅनरखाली देशातील १५४ हून अधिक शेतकरी संघटना या आंदोलनात सामील झाल्या असून, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख मा. खा. राजू शेट्टी, माजी मंत्री महादेव जानकर आणि राष्ट्रीय किसान मोर्चाचे नेते सरदार व्ही. एम. सिंह यांच्यासह हजारो शेतकऱ्यांना पोलिसांनी राजघाट आणि दिल्लीच्या सीमा भागातून ताब्यात घेतले आहे.