
Fatehabad Toll employees protest on Dhanteras over low Diwali bonus, opening toll barriers on the Agra-Lucknow Expressway, leading to thousands of vehicles passing without payment.
esakal
उत्तर प्रदेशातील फतेहाबादमध्ये टोल टॅक्स कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस कमी मिळाल्यानंतर टोल नाक्याचे गेट मोकळे सोडले. त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी आग्रा येथील लखनौ एक्सप्रेसवेवरून हजारो वाहने टोल टॅक्स न भरताच गेली. यात कंपनीला लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. कर्मचाऱ्यांनी मॅनेजरला दिवाळी बोनस मागितला तेव्हा मॅनेजरने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले, त्यानंतर त्यांनी बूम बॅरियर्स मोडले.