
लग्नासाठी पाहिलेल्या मुलासोबत मुलीने केलं असं काही की वडीलही संतापले, चॅट व्हायरल
बेंगळूरू स्थित सॉल्टची सहसंस्थापक उदिता पॉल आणि तिचे वडिलांचं संभाषण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलायं. या संभाषणाचा स्क्रीन शॉट मुलीने शेअर केला आहे. उदिता पॉलला तिच्या वडिलांनी लग्नासाठी एका मुलाचा बायोडाटा पाठवला. मात्र उदिताने चक्क त्या मुलाला स्वत:च्या कंपनीत हायर करण्यासाठी त्याचे जॉब प्रोफाइल आणि लिंक पाठवण्यास सांगितले होते. त्यानंतर तिचे वडिल तिच्यावर चांगलेच तापल्याची एक चॅट समोर आली आहे. ही चॅट सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.(Co-founder of Salt Udita Pal's father forwarded a groom's profile to her and she attempted to hire the man for her company)
व्हायरल पोस्टमधील चॅटमध्ये उदिताचे वडील म्हणतात, “आपण बोलू का? आवश्यक आहे. तु काय केले ते तुम्हाला माहीत आहे. तु मॅट्रिमोनियल साइट्सवरून लोकांना कामावर घेऊ शकत नाही. आता मी त्याच्या वडिलाला काय उत्तर देऊ? मला तुझा मॅसेज दिसला ज्यात तु त्याला मुलाखतीची लिंक आणि रिझ्युम पाठवायला सांगितला आहे. मला उत्तर दे.” यावर उदीता म्हणते, 'फिनटेकचा ७ वर्षांचा अनुभव उत्तम आहे. आम्ही त्याला कामावर घेत आहोत. मला माफ करा.'
आणखी एका ट्विटमध्ये तिने तीने यासंदर्भात अपडेट दिली. तिने सांगितले की त्या मुलाने वार्षिक ₹ 62 लाख पगार मागितला होता एवढा पगार देणे तिच्या कंपनीला परवडत नाही. सोबत तिने सांगितले की तिच्या वडिलांनी तिची वैवाहिक प्रोफाइल हटवली
या सर्व प्रकरणावर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली. अगदी मॅट्रिमोनिअल साइट Jeevanathi.com ने या घटनेला विनोदी प्रतिसाद देत म्हटले आहे की, "तुमच्याकडे अजून ओपनिंग असेल तर आम्हाला कळवा आणि आम्ही योग्य जीवनसाथीसाठी अर्ज करू."
Web Title: Father Forwarded A Grooms Profile To His Daughter And She Attempted To Hire The Man For Her Company
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..