
दिल्लीतील तिमारपूर इथं एक धक्कादायक अशी घटना घडलीय. २६ वर्षीय तरुणाने कारमध्ये पुढच्या सीटवर बसण्यावरून वडिलांची गोळ्या झाडून हत्या केलीय. तरुणाचे वडील सीआयएसएफमधून निवृत्त उपनिरीक्षक होते. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कुटुंबाने उत्तराखंडमधील मूळ गावी जाण्यासाठी कार भाड्यानं घेतली होती. मुलानेच वडिलांची गोळ्या झाडून हत्या केलीय. मुलाचं नाव दीपक असं आहे. त्याला घटनास्थळावरून अटक करण्यात आलीय. तर या गुन्ह्यात वापरण्यात आलेली बंदूक आणि ११ काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.