खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये पैशांसाठी बापानेच 4 महिन्यांच्या चिमुकलीला विकलं

सूरज यादव
Thursday, 23 July 2020

कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर उद्योग-व्यवसाय पूर्ण ठप्प झाले. अशा परिस्थितीत हातावर पोट असलेल्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत.

दिसपूर - कोरोनामुळे जगाच्या अर्थव्यवस्थेला मोठा दणका बसला आहे. अनेक देशांनी कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन केल्यानंतर उद्योग-व्यवसाय पूर्ण ठप्प झाले. याशिवाय नोकर कपातीमुळे बेरोजगारीची कुऱ्हाडही कोसळली. अशा परिस्थितीत हातावर पोट असलेल्या लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. भारतातही गेल्या चार महिन्यांपासून लॉकडाऊन आहे. कोरोना लॉकडाऊन आणि आता पुराने आसाममध्ये हाहाकार उडाला आहे. यामुळे तिथलं जनजीवन विस्कळीत झालं आहे. दरम्यान, आसाममध्ये एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. आर्थिक चणचण असलेल्या एका बापाने त्याच्या चार महिन्यांच्या चिमुकलीला 45 हजार रुपयांत विकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

आसाममधील कोकराझार जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकाऱ घडला आहे. कोरोनाच्या संकटात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बिघडली. त्यांना पैशांची इतकी चणचण भासायला लागली की बापाने अवघ्या चार महिन्यांच्या चिमुकलीला विकलं. 

हे वाचा - खळबळजनक! लॉकडाऊनमध्ये पैशांसाठी बापानेच 4 महिन्यांच्या चिमुकलीला विकलं

कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्यानंतर हातातलं काम गेलं. त्यानंतर अडचणी वाढायला लागल्या तेव्हा तीन मुलांच्या बापासमोर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न पडला. गेल्या चार महिन्यांपासून काम नसलेल्या बापाने अखेर त्याच्या मुलीला विकण्याचा निर्णय घेतला. दीपक ब्रह्मा असं त्या बापाचं नाव असून तो गुजरातमध्ये काम करत होता. लॉकाडऊन झाल्यानं तो आसाममध्ये असलेल्या गावी परतला होता. काही पैसे वाचवले होते त्यातले बरेच पैसे या प्रवासासाठी खर्च करावे लागले. 

घरी पोहोचल्यानंतर त्याचकडे ना पैसे होत ना कोणतं काम. अशा परिस्थितीत घरी खाण्यासाठी काहीच नव्हते. तेव्हा दीपकला मुलीला विकण्याशिवाय दुसरा पर्याय दिसला नाही. त्यानं मुलीला विकल्याची माहिती स्थानिक एनजीओला समजली. त्या एनजीओने कोकराझार पोलिसांच्या मदतीने मुलीची सुटका केली. 

हे वाचा - आसामसह आठ राज्यात पावसाचं थैमान; आतापर्यंत ४७० बळी

चार महिन्यांच्या मुलीला पुन्हा परत आणण्यासाठी दीपकच्या गावकऱ्यांनीसुद्धा मदत केली. पोलिसांनी मुलीला विकत घेणाऱ्यांना आणि यासाठी मदत करणाऱ्यांना अटक केलं आहे. त्यांच्यावर कलम 370 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अटक केलेल्यांमध्ये मुलीचा बाप आणि मुलीच्या विक्रीत दलाली करणाऱ्या एकाचा समावेश आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: father sold 4 month girl for money in assam