नात्याला काळिमा! १६ वर्षांच्या मुलीवर बापाचा ५ वर्षांपासून बलात्कार

atyachar
atyacharatyachar

बापाने पाच वर्षांपासून स्वत:च्या मुलीसोबत शारीरिक संबंध (Fathers atrocities on daughter) ठेवले. आईला काहीही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलीने केणाला काहीही सांगितले नाही आणि वडिलांकडून शारीरिक अत्याचार सहन करीत राहिली. मुलगी घराबाहेर न आल्याने आईने विचारपूस केली तेव्हा मुलीने संपूर्ण घटना सांगितली. यानंतर अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी वडिलांना अटक करून कारागृहात रवानगी (Father Arrested) केली. नात्याला काळिमा फासणारी घटना छत्तीसगडमधील (Chhattisgarh) बिलासपूर जिल्ह्यात घडली.

अल्पवयीन मुलगी घराबाहेर न आल्याने तिच्या आईने विचारपूस केली असता, मुलीने वडिलांच्या मागील पाच वर्षांच्या कारभाराचा सगळा कच्चा लेखाजोखा उघडला. मुलीची वेदनादायक कहाणी ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. स्तब्ध झालेल्या आईने तासनतास हिंमत एकवटून आपल्या मुलीसह कोणी पोलीस ठाणे गाठले. अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी वडिलांना अटक करून कारागृहात रवानगी केली.

atyachar
शिक्षिकेने विद्यार्थ्यासोबत ठेवले संबंध, नंतर केले लग्न; अशी झाली सुटका

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी १६ वर्षांची आहे. ती अकरावीत शिकते. तिचे वडील मजुरीचे काम करतो तर आई सरकारी कर्मचारी आहे. मुलगी ११ वर्षांची असताना वडिलाने पहिल्यांदा तिच्याशी शारीरिक संबंध (Fathers atrocities on daughter) ठेवत होते. याबद्दल कोणालाही सांगितल्यास ठार मारण्याची धमकी दिली. भीतीपोटी मुलीने कोणाला काहीही सांगितले नाही. यामुळे त्याची हिंमत वाढणी आणि तो तिच्यासोबत वारंवार शारीरिक संबंध ठेऊ लागला. असे तो तब्ब्ल पाच वर्षांपासून करीत होता. आता त्याची मुलगी ११ वर्षांची झाली आहे.

मुलगी हळूहळू मोठी झाली आणि तिला आपल्यासोबत काय सुरू आहे हे समजू लागले. यानंतर वडिलाने मुलीला घराबाहेर पडण्यावर बंदी घातली. भीतीमुळे मुलगी खेळायलाही घराबाहेर पडत नव्हती. आई शासकीय नोकरीवर असल्याने अनेक वर्षे तिला याची कल्पनाच नव्हती. मुलगी घरातच राहत असल्याने व खेळण्यासाठीही बाहेर पडत नसल्याने आईला संशय आला. ऐकेदिवशी तिने मुलीची विचारपूस केली.

atyachar
सरकारी कर्मचाऱ्यांना आता दोन दिवस सुटी; या राज्याने घेतला निर्णय

आईच्या पायाखालची जमीनच सरकली

आईने विचारल्यानंतर तिने पाच वर्षांपासून सुरू असलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. मुलीच्या तोंडून सत्य ऐकून आईच्या पायाखालची जमीनच सरकली. आईने मुलीसह पोलिस ठाणे गाठले आणि वडिलांविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी वडिलाला न्यायालयात हजर केले आणि त्याची रवानगी कारागृहात (Father Arrested) केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com