महिलेने केला अल्पवयीन मुलावर बलात्कार...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

एका अल्पवयीन मुलावर महिलेने बलात्कार केल्याची घटना घडली असून, पलवल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चंदीगड (हरियाणा): एका अल्पवयीन मुलावर महिलेने बलात्कार केल्याची घटना घडली असून, पलवल पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियकर हवा पण स्वतःचे बाळ नको म्हणून तिने...

तपास आधिकारी अंजू देवी सांगितले की, एका 29 वर्षीय महिलेने सप्टेंबर 2019 मध्ये 14 वर्षीय मुलाविरोधात बलात्कारचा गुन्हा दाखल केला होता. महिलेच्या तक्रारीनंतर अल्पवयीन मुलाला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे त्या मुलाची नंतर न्यायालयाने या गुन्ह्यातून मुक्तता केली. मुलगा अल्पवयीन असल्यामुळे न्यायालयाने महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. शिवाय, या प्रकरणाची कसून चौकशी करण्याच्या सूचनाही पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार, पलवल पोलिस ठाण्यात त्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रेयसी कोणत्याही वेळी घरी यायची अन्...

महिलेने दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले होते की, काही वर्षापूर्वी माझ्या पतीचे निधन झाले आहे. पतीच्या निधनानंतर मी पलवलमध्ये एका भाड्याच्या घरामध्ये राहायला आले. तिथे एका मुलाबरोबर ओळख झाली. ओळखीनंतर तो मुलगा माझ्या घरी येत होता. त्याने मला विवाहाचेचे आश्वासन दिले. त्यानंतर आम्ही एकत्र राहू लागलो. आमच्यात अनेकवेळा शरीरिक संबंध झाले. पण, गर्भवती राहिल्यानंतर तो विवाह करण्यास नकार देऊ लागला. त्यानंतर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यावरून मुलाला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र, आता या महिलेवर बलात्काराचा आरोप करून गुन्हा दाखल करण्यात आला असून, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

शेतात पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन्...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fir registered against woman for allegedly raping a minor boy