प्रियकर हवा पण स्वतःचे बाळ नको म्हणून तिने...

वृत्तसंस्था
मंगळवार, 14 जानेवारी 2020

प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तिने बाळाला जन्म दिला. पण, जन्म दिल्यापासून बाळाला दूध पाजलेच नाही. प्रियकर बाहेर गेल्यानंतर बाळाचा गळा दाबला आणि मृतदेह तलावात फेकून दिला. याप्रकरणी युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

रायपूर (छत्तीसगड): प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात होती. तिने बाळाला जन्म दिला. पण, जन्म दिल्यापासून बाळाला दूध पाजलेच नाही. प्रियकर बाहेर गेल्यानंतर बाळाचा गळा दाबला आणि मृतदेह तलावात फेकून दिला. याप्रकरणी युवतीला ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

प्रेयसी कोणत्याही वेळी घरी यायची अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेमराज याचे मोनिकासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाल्यानंतर दोघे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. मोनिका गर्भवती राहिल्यानंतर खेमराजने बाळाला जन्म देण्याचा निर्णय घेतला. परंतु, मोनिका नाराज होती. मोनिकाने 6 जानेवारी रोजी बाळाला जन्म दिला. बाळाला जन्म दिल्यापासून मोनिका स्तनपान करत नव्हती. बाळ सतत रडत असल्यामुळे खेमराजची वहिणी बाळाला दूध पाजत होती. बाळ पाच दिवसांचे झाल्यानंतर खेमराज कामानिमित्त घराबाहेर गेला होता. यावेळी मोनिकाने बाळाचा गळा दाबून खून केला व मृतेदह तलावात फेकून दिला. खेमराज घरी आल्यानंतर बाळाला कोणीतरी घेऊन गेले म्हणून रडू लागली. खेमराजने बाळाचा शोध घेतला पण न सापडल्यामुळे पोलिसांकडे तक्रार दाखल केली.

शेतात पत्नीला नको त्या अवस्थेत पकडले अन्...

पोलिसांनी बाळाचा शोध सुरू केला. पण, बाळ आढळले नाही. मोनिकाची चौकशी सुरू केल्यानंतर ती आडखळू लागली. पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर तिने बाळाचा खून केल्याचे सांगितले. मोनिकाला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

शरीराच्या 'या' भागावार 'तीळ' असेल तर तुम्ही...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: girl did murder of her new born baby at chhattisgarh