
गेल्या आठवड्यात तिरुपती मंदिरात चेंगराचेंगरीची दुर्घटना झाली होती. त्यानंतर आता पुन्हा एक दुर्घटना घडलीय. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. तिरुपती मंदिरात सोमवारी लाडू वितरण केंद्राजवळ आग लागली. काउंटरवर मोठ्या संख्येने भाविकांची गर्दी असताना घडलेल्या या घटनेमुळे काही काळ गोंधळ निर्माण झाला होता. आग नेमकी कशामुळे लागली याची माहिती समजू शकलेली नाही. प्रशासनाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.