Video : दिल्लीत भीषण आगीतून लोकांना वाचवताना जवानच दबले ढिगाऱ्याखाली

वृत्तसंस्था
गुरुवार, 2 जानेवारी 2020

पिरागढ परिसरातील एका कारखान्यात ही भीषण आग लागली. पण आग नियंत्रणात आणायला गेलेल्या जवानांबरोबर पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली आहे. यात 12 जण गंभीर जखमी असून जीवित हानी झालेली नाही.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत आगीच्या घटना वारंवार घडत असतानाच आज (ता. 2) सकाळीही दिल्लीत भीषण आग लागली. पिरागढ परिसरातील एका कारखान्यात ही भीषण आग लागली. पण आग नियंत्रणात आणायला गेलेल्या जवानांबरोबर पुन्हा एक दुर्दैवी घटना घडली आहे. यात 12 जण गंभीर जखमी असून जीवित हानी झालेली नाही.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कारखान्याला आग लागल्यानंतर अग्निशामन दलाने आग नियंत्रणात आण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, बचावकार्य सुरू असतानाच आगीमुळे स्फोट होऊन इमारत कोसळली. यात अग्निशामन दलाच्या जवानांसह इतर लोकही अडकले आहेत. त्यांना काढण्यासाठी आणखी 30 ते 35 अग्निशामन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. 

अंगणात आला म्हणून दिव्यांग बाळाला फावड्याने मारले

 

पिरागढ परिसरातील हा कारखाना बॅटरीचा असून या बॅटरीमुळेच आग लागल्याचे समजत आहे. या स्फोटामुळे इमारतीचा काही भाग कोसळला असून, त्याखाली दबल्या गेलेल्या जवान व लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: fire at Piragadh area in delhi