नवनिर्वाचित आप आमदारावर जीवघेणा हल्ला; एका कार्यकर्त्याचा मृत्यू

वृत्तसंस्था
Wednesday, 12 February 2020

निकालाच्या काही तासांनंतरच नवनिर्वाचित आमदारासह विचित्र घटना घडली. आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. 

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणूकांमध्ये आपने पुन्हा एकदा आपला करिष्मा दाखवला. मात्र, निकालाच्या काही तासांनंतरच नवनिर्वाचित आमदारासह विचित्र घटना घडली. आम आदमी पक्षाचे नवनिर्वाचित आमदार नरेश यादव यांच्या ताफ्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात आपच्या एका कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. 

Delhi Elections : दिल्लीत झालेल्या पराभवावर काँग्रेस म्हणते...

दिल्लीतील महरौली विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार नरेश यादव हे विजयानंतर देवदर्शनासाठी मंदिरात गेले होते. तेथून परतताना त्यांच्यावर गोळीबार करण्यात आला. या हल्ल्यात त्यांच्यासोबतचे कार्यकर्ते अशाक मान यांचा मृत्यू झाला आहे. हा हल्ला कोणी केला याबाबत अजूनही काही माहिती मिळालेली नाही. 

Delhi Election : 'आय लव्ह यू' म्हणत विजयानंतर केजरीवालांनी दिली 'ही' प्रतिक्रीया 

आमदार यादव म्हणाले, 'हा हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे. हा हल्ला आमच्यावर का झाला याबाबत मला अजूनही कल्पना नाही. अचानक करण्यात आलेल्या या हल्ल्या ४ राऊंड्स फायरिंग करण्यात आले. मी ज्या गाडीत बसलो होतो, त्यावर बंदुक रोखून गोळीबार करण्यात आला. पोलिसांनी योग्य प्रकारे तपास केल्यास हल्लेखोराला ओळखता येईल.'

याबाबत दिल्ली पोलिसांकडे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नरेश यादव यांच्या विरोधात भाजपचे कुसुम खत्री रिंगणात होते. यादव यांनी खत्री यांचा तब्बल १८, १६१ मतांनी पराभव केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Firing at AAP MLA Naresh Yadav by unknown after delhi elections results