
India-Pakistan conflict
esakal
पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात असल्याचे स्पष्ट झाले होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत पुरावे सादर केले होते. या हल्ल्यात २६ भारतीयांचा मृत्यू झाला होता. पाकिस्तानी दहशतवाद्यांनी धर्म विचारून लोकांना मारले. त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. दरम्यान, पाकिस्तानने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी म्हणजे शनिवारी कुपवाडा नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. भारताने देखील या नापाक कृत्याला चोख प्रत्युत्तर दिले.