व्हेटिकन सिटीकडून 'या' सामान्य भारतीयाला पहिल्यांदाच मिळणार 'संत'पद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

व्हेटिकन सिटीकडून 'या' सामान्य भारतीयाला पहिल्यांदाच मिळणार 'संत'पद

व्हेटिकन सिटीकडून 'या' सामान्य भारतीयाला पहिल्यांदाच मिळणार 'संत'पद

18 व्या शतकात हिंदू धर्म सोडून ख्रिश्चन बनलेल्या देवसहायम पिल्लाई यांना आता संतपद बहाल केलं जाणार आहे. व्हेटिकनमध्ये 'काँग्रिगेशन फॉर द कॉजेज ऑफ सेंट्स'ने ही घोषणा केली आहे. ते भारतातील असे पहिले सामान्य व्यक्ती असणार आहेत, ज्यांना संत उपाधी दिली जाणार आहे. धर्मगुरूखेरीज इतर कोणत्याही भारतीयाला संतपद दिलं जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.

हेही वाचा: 'याला वेडेपणा म्हणू की देशद्रोह', वरुण गांधी कंगनावर संतापले

चर्चच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, पोप फ्रान्सिस 15 मे 2022 रोजी व्हेटिकनच्या सेंट पीटर्स बेसिलिकामध्ये पिल्लई यांना इतर सहा जणांसोबत संत घोषित केलं जाईल. यासोबतच पिल्लई संत उपाधी प्राप्त करणारे पहिले सामान्य व्यक्ती ठरतील. 1745 मध्ये ख्रिश्चन धर्म स्विकारल्यानंतर 'लेजारुस' असं नाव त्यांनी धारण केलं होतं. 'लेजारुस'चा अर्थ 'देवसहायम' किंवा 'देवांची सहायता' असा आहे.

व्हेटिकनद्वारे सांगण्यात आलंय की, प्रचार करताना त्यांनी खासकरुन जातीप्रथेचा भेदभाव असूनही सगळ्यांच्या समानतेवर जोर दिला. त्यामुळे उच्चवर्णीयांमध्ये त्यांच्याबाबत द्वेष निर्माण झाला आणि त्यांना 1749 मध्ये अटक करण्यात आली. त्यांचा अतोनात छळ झाल्यानंतर त्यांना 14 जानेवारी 1752 रोजी गोळी घालून ठार करण्यात आलं. त्यानंतर त्यांना हुतात्म्याचा दर्जा प्राप्त झाला.

हेही वाचा: तालिबान्यांच्या दहशतीनं 3 लाख लोक अफगाणिस्तानातून पळाले इराणला

पिल्लई यांना त्यांच्या जन्माच्या 300 वर्षांनंतर 2 डिसेंबर 2012 मध्ये कोट्टारमध्ये 'ब्लेस्ड' अर्थात 'पवित्र' घोषित करण्यात आलं. त्यांचा जन्म 23 एप्रिल 1712 रोजी कन्याकुमारी जिल्ह्यातील नट्टलममध्ये एका हिंदू कुटुंबामध्ये झाला होता. हा तत्कालीन त्रावणकोर साम्राज्याचा भाग होता.

loading image
go to top