चिराग पासवान यांना झटका, खासदारांनी पुकारले बंड

या खासदारांनी लोकसभेला अधिसूचित केले आहे.
Chirag Paswan
Chirag Paswan

नवी दिल्ली: लोक जनशक्ती पार्टीचे (LJP) प्रमुख चिराग पासवान (Chirag Paswan) यांच्या नेतृत्वाविरोधात त्यांच्याच पक्षाच्या खासदारांनी बंडाचे निशाण फडकवले आहे. लोकसभेतील सहापैकी पाच खासदारांनी बंड पुकारले आहे. आपण लोक जनशक्ती पक्षाशी संबंधित नसून आपल्याला स्वतंत्र समजण्यात यावे, असे या खासदारांनी लोकसभेला अधिसूचित केले आहे. (Five LJP MPs revolt against Chirag Paswan)

बंड पुकारणाऱ्या खासदारांचे नेतृत्व पशुपती कुमार पारस करत असून ते चिराग पासवान यांचे काका आहेत. बंडखोर खासदारांमध्ये प्रिन्स राज (चुलत भाऊ), चंदन सिंह, वीणा देवी आणि मेहबूब अली केशर यांचा समावेश आहे. या सर्व खासदारांचे चिराग पासवान यांच्या बरोबर पटत नव्हते. मागच्यावर्षी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत लोक जनशक्ती पार्टीने खूप खराब कामगिरी केली होती.

Chirag Paswan
मुंबई: महिला पोलीस अधिकाऱ्यावर बलात्कार, FB वरुन मैत्री

LJP पासून आपल्याला स्वतंत्र ओळख देण्यात यावी, असे या पाच नेत्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. LJP चे हे नाराज खासदार सत्ताधारी जेडीयूमध्ये प्रवेश करु शकतात, असे सूत्रांनी सांगितले.

यावर्षी एप्रिल महिन्यात माजी एलजेपी नेते केशव सिंह यांनी चिराग पासवान यांच्या विरोधात केस दाखल केली. बिहार विधानसभा निवडणुकीच्यावेळी पक्ष सदस्यांची फसवणूक केल्याचा आरोप त्यांनी केला. फेब्रुवारी २०२१ मध्ये केशव सिंह यांनी जेडीयूमध्ये प्रवेश केला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com