
धूर आल्याने रुळावर आले.. आणि कोणार्क एक्सप्रेसने पाच जणांना चिरडलं!
आंध्र प्रदेशातील श्रीकाकुलम येथे सोमवारी रात्री रेल्वेने धडक दिल्याने पाच प्रवाशांचा चिरडून मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत आणखी एक प्रवासी गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केलाय. या घटनेवर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी यांनी शोक व्यक्त केलाय.
श्रीकाकुलम जिल्ह्यातील बटुवा गावात सोमवारी रात्री हा अपघात झाला. जेव्हा रात्री प्रवाशांना ट्रेनमधून धूर येत असल्याचे लक्षात आले तेव्हा त्यांनी आपत्कालीन साखळी ओढली. त्यानंतर प्रवासी ट्रेनमधून उतरले आणि रुळावर उभे राहिले. त्याचवेळी विरुद्ध दिशेने दुसऱ्या ट्रॅकवरून येणाऱ्या कोणार्क एक्स्प्रेसने त्यांना चिरडले. या घटनेने आंध्रप्रदेशमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
ही ट्रेन भुवनेश्वरहून विशाखापट्टणमला जात होती. मृतांपैकी दोघे मूळचे आसामचे असून इतरांची ओळख अद्याप पटलेली नाही.
Web Title: Five Passengers Were Crushed To Death After Konark Express Ran Them Over In Andhra Pradesh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..