

Karachi Attack
ESakal
पाकिस्तानमधील कराची येथे सिंध रेंजर्सच्या छावणीवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान लष्कराची माध्यम शाखा, आयएसपीआरने या हल्ल्यासाठी भारताला जबाबदार धरले आहे. मात्र, या आरोपावर भारताकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. आयएसपीआरच्या म्हणण्यानुसार, २७ जूनच्या रात्री कराचीमधील पाकिस्तान रेंजर्स छावणीच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक स्फोट झाला.