परदेशी खरेदीदार वळले भारतातील चहाच्या बाजाराकडे; यादीत ‘त्या’ देशाचाही समावेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Foreign buyers turned to the Indian tea market

परदेशी खरेदीदार वळले भारतातील चहाच्या बाजाराकडे; ‘त्या’ देशाचाही समावेश

नवी दिल्ली : उत्तर भारतातील उत्तर भारतीय चहाच्या वाढत्या किमती आणि श्रीलंकेत सुरू असलेल्या आर्थिक संकटामुळे परदेशी खरेदीदारांचा कल कोचीकडे (tea market) वळला आहे. आता चहा विकत घेणारे विदेशी खरेदीदार कोचीमधून मोठ्या प्रमाणात चहा विकत घेत आहेत. यामध्ये विशेषतः इराण आणि तुर्कीचा समावेश आहे. (Foreign buyers turned to the Indian tea market)

कोलकाता लिलावात दुसऱ्या कापणीतील चहाच्या पानाच्या किमती ३५०-४५० रुपये प्रति किलो राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे दक्षिण भारतातील बाजारातून परदेशी खरेदीदार केवळ इराणच नव्हे तर तुर्कस्तान व रशिया चहा विकत घेत आहेत. नुकतेच तुर्कीने भारतीय गव्हाची (wheat) एक खेप परत केली होती. गव्हात रुबेला विषाणू असल्याचे त्यांनी सांगितले होते. आता तो चहाच्या खरेदीसाठी भारतीय बाजारपेठेकडे वळला आहे.

हेही वाचा: एकनाथ शिंदे आपल्या ‘त्या’ विधानावरून पलटले; स्पष्टीकरण देत म्हणाले...

सीटीसी डस्टच्या दरात ३ ते ५ रुपयांची वाढ होऊन ती १२७ रुपये किलोपर्यंत पोहोचली आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यंदा सहा रुपयांनी वाढ झाली आहे. ‘इराण आणि इतर पश्चिम आशियाई देश दक्षिण भारतीय आणि उत्तर भारतीय बाजारातून चहा खरेदी करतात. उत्तम दर्जाच्या सीटीसी चहाच्या वाढत्या किमतींनी त्यांना दक्षिण भारतीय चहाच्या बाजाराकडे खेचले आहे’, असे दक्षिण भारतातील आघाडीच्या चहा निर्यातदाराने सांगितले.

‘बिझनेस लाइन’च्या अहवालानुसार, निलगिरीच्या पानांना चांगली मागणी आहे. यासोबतच भावही वाढले आहेत. चहाच्या पानांचे दर किलोमागे सरासरी ४ रुपयांनी वाढून १५९ रुपये झाले आहेत. यासोबतच ग्रेडमध्ये दिल्या जाणाऱ्या चहाचे प्रमाणही वाढले आहे.

हेही वाचा: नितीन देशमुखांचा गॉडफादर कोण? त्यांच्या शब्दावरून घेतला ‘यू टर्न’!

मागणी वेगाने वाढली

श्रीलंकेच्या चहाच्या बाजारपेठेतील अनिश्चिततेमुळे चहाची मागणी वाढली आहे. परंतु, चहाची पाने (tea) सगळीकडे मिळत नाहीत. चहाची वाढती मागणी काही काळ कायम राहू शकते. वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी दक्षिण भारतातील तीन मोठ्या चहा उत्पादकांनी चहाचे उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कुन्नूर लिलावात सीटीसी डस्टची मागणी कमकुवत झाली आहे. यामुळे किमतीत मोठी घसरण झाली आहे. प्रस्तावित प्रमाणांपैकी ७५ टक्के विकले गेले नाही.

Web Title: Foreign Buyers Turned To The Indian Tea Market

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :IndiaTea