

Former bjp MLA killed
Esakal
Rajasthan BJP Leader Death: माजी आमदार आणि भाजप नेत्याची काठी आणि दगडांनी मारहाण करत हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या भाजप नेत्याचा रुग्णालयात नेण्याआधीच मृत्यू झाला. राजस्थानच्या भरतपूर जिल्ह्यात ही घटना घडलीय. क्रशर प्लांट आणि खाणीच्या करारावरून वाद सुरू होता. या वादातून रविवारी रात्री हिंसक घटना घडली. अतर सिंह भडाना असं हत्या झालेल्या भाजप नेत्याचं नाव आहे.