CBI च्या माजी अधिकाऱ्याला 25 लाखांच्या लाच प्रकरणी अटक; महिन्याभरापूर्वी झालाय निवृत्त

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 3 October 2020

 केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेल्या एनएमपी सिन्हा यांना शनिवारी लाच घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आली. 

नवी दिल्ली - केंद्रीय अन्वेषण विभागात (सीबीआय) पोलिस अधीक्षक म्हणून काम केलेल्या एनएमपी सिन्हा यांना शनिवारी लाच घेतल्याप्रकऱणी अटक करण्यात आली. त्यांच्यावर 25 लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप आहे. एनएमपी सिन्हा यांच्यासह एका तरुणालाही अटक केली आहे. नवी दिल्लीतून दोघांनाही ताब्यात घेण्यात आलं. 

दिल्ली पोलिसांनी अटक केलेले एनएमपी सिन्हा यांनी सीबीआयचे माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांचे ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी म्हणूनही काम केलं आहे. एक महिन्यापूर्वीच सिन्हा हे सीबीआयमधून निवृत्त झाले होते. त्यांच्यावर सीबीआयमध्ये एका पक्षाच्या बाजुने प्रकरणाचा तपास करण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप केला होता. 

हे वाचा - Hathras - अखेर स्मृती इराणींनी सोडलं मौन, राहुल गांधींवर केली टीका

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, एनएमपी सिन्हा यांना पोलिसांनी अटक केली असून त्यांनी कोणत्या प्रकरणात ही लाच घेतली याचा खुलासा झालेला नाही. सीबीआयकडून याची माहिती अद्याप समोर आली नाही. शनिवारी एनएम सिन्हा यांना न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सिन्हा सीबीआय़मध्ये माजी विशेष संचालक राकेश अस्थाना यांचे ओएसडी होते. गेल्याच महिन्यात राकेश अस्थाना यांना बीएसएफचे डीजी म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: former cbi police arrest in 25 lakh bribe case