Shivraj Patil Chakurkar : वादग्रस्त वक्तव्यानंतर पाटलांची सारवासारव; कुराण शरीफचा संदर्भ देत म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shivraj Patil Chakurkar
Shivraj Patil Chakurkar : वादग्रस्त वक्तव्यानंतर पाटलांची सारवासारव; कुराण शरीफचा संदर्भ देत म्हणाले...

Shivraj Patil Chakurkar : वादग्रस्त वक्तव्यानंतर पाटलांची सारवासारव; कुराण शरीफचा संदर्भ देत म्हणाले...

काँग्रेसचे नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या विधानाने आता मोठा वाद निर्माण झाला आहे. श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त विधान केल्यानंतर त्यांनी आता आपल्या विधानाचं स्पष्टीकरण दिलं आहे. गीतेची तुलना जिहादशी केल्याने आता ते राजकीय वादात सापडले आहेत.

हेही वाचा: Shivraj Patil Chakurkar: वाद पेटणार! गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला; शिवराज पाटलांचे विधान

आपल्या या वादग्रस्त विधानावर चाकूरकर यांनी स्पष्टीकरणही दिलं आहे. याबद्दल बोलताना ते म्हणाले, "कुराण शरीफ वाचा, त्यानंतर बोललो मी. कुराणात म्हटलंय की जर एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की खूप मोठ्या संख्येने देव नाहीत. देव एकच आहे, त्याचं कुठलंही रुप नाही, रंग नाही, आकार नाही. म्हणून ते मूर्ती लावत नाहीत. ख्रिश्चनांमध्येही हीच कल्पना आहे. त्यानंतर ज्यू धर्मातही हीच कल्पना आहे. देव आहे पण त्याची मूर्ती नाही करू शकत . कारण गीतेतच सांगितलंय की देवाचं रुप नाही, आकार नाही. मग देव आहे काय? देवाने हे विश्व बनवलं आहे".

हेही वाचा: लक्ष्मीपूजनाने धन मिळालं असतं तर मुस्लीम...; भाजपा नेत्याचं विधान वादात; पुतळा जाळला!

काय म्हणाले होते शिवराज पाटील चाकूरकर?

"जिहादचा विषय तेव्हा येतो जेव्हा मनात स्वच्छ विचार असून देखील त्यापध्दतीचे काम करण्याचा प्रयत्न केल्यानंतर देखील कोणी ते समजून घेत नसेल तर म्हटले जाते की शक्तीचा उपयोग करावा लागला तर तो केला पाहिजे. हे फक्त कुराणमध्ये सांगितलेले नाहीये. तर ते महाभारतात जो गीतेचा भाग आहे त्यामध्ये श्रीकृष्ण देखील अर्जुनाला जिहादबद्दलच सांगतात".

टॅग्स :quran sharif